इंडोनेशिया मास्टर्सच्या फायनलमध्ये सायनाचा पराभव
भारताची फुलराणी सायना नेहवालचा इंडोनेशिया मास्टर्सच्या अंतिम फेरीत पराभव झालाय. सायनाची जुनी प्रतिस्पर्धी आणि वर्ल्ड नंबर वन ताय जु यिंग हिच्याकडून सायनाचा पराभव झाला.
जकार्ता : भारताची फुलराणी सायना नेहवालचा इंडोनेशिया मास्टर्सच्या अंतिम फेरीत पराभव झालाय. सायनाची जुनी प्रतिस्पर्धी आणि वर्ल्ड नंबर वन ताय जु यिंग हिच्याकडून सायनाचा पराभव झाला.
इंडोनेशिया मास्टर्सच्या फायनलमध्ये ताय त्झु यिंगने सायनाला ९-२१, १३-२१ असे अवघ्या २७ मिनिटांत हरवले. ताय त्झु यिंगकडून सायनाचा हा नववा पराभव आहे.
दुखापतीतून सावरल्यानंतर तब्बल एका वर्षानंतर सायना एखाद्या स्पर्धेच्या फायनलमध्ये खेळत होती. मात्र सायनाला या अंतिम सामन्यात जिंकण्याची संधीच यिंगने दिली नाही.
पहिल्या गेममध्ये सायनाला ९-२१ असा पराभव सहन करावा लागला. दुसऱ्या गेममध्ये तिने थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र तोही यिंगने हाणून पाडला.