इंदूर : दोन मॅचसमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आता ऑस्ट्रेलियन टीमने विजयासाठी नवा प्लॅन आखला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी होणाऱ्या तिसऱ्या वन-डे मॅचमध्ये विजय मिळविण्यासाठी ऑस्ट्रेलियन टीम मैदानात उतरणार आहे. यावेळी सर्वांची नजर असेल ती म्हणजे अॅरॉन फिंचवर. सध्या फिंच दुखापग्रस्त आहे मात्र, तो फिट होऊन मैदानात उतरेल अशी अपेक्षा ऑस्ट्रलियन टीम करत आहे.


या सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियन बॉलर्स चांगली बॉलिंग करत आहेत मात्र, बॅट्समनचा परफॉर्मन्स खास नाहीये. ऑस्ट्रेलियन टीमला चांगल्या सुरुवातीची अपेक्षा आहे तसेच भारतीय स्पिनर्सला उत्तर देण्यासाठी बॅट्समन प्रयत्नात आहेत.


प्रॅक्टीस मॅच दरम्यान फिंच चांगली बॅटींग करत होता आणि त्याला कुठलाही त्रास होत नव्हता. वॉर्नरने म्हटलं की, फिंच एक चांगला प्लेअर आहे आणि गेल्या काही वर्षांत त्याने अनेक मॅचेस खेळल्या आहेत. तो ओपनिंग बॅटींगमध्ये एक आक्रमकता आणतो. आम्हाला अपेक्षा आहे की, तीसरी वन-डे मॅच खेळण्यासाठी तो पूर्णपणे फिट होईल.