मुंबई : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वन-डे मॅचमध्ये टीम इंडियाने टॉस जिंकत प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने ५० ओव्हर्समध्ये २८० रन्स केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाने ८ विकेट्स गमावत २८० रन्स केले आणि न्यूझीलंडसमोर विजयासाठी २८१ रन्सचं आव्हान ठेवलं आहे. या मॅचमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याने धडाकेबाज बॅटींग करत टीमला मोठा स्कोर उभा करण्यात मदत केली.


टीम इंडियाकडून ओपनिंगसाठी आलेल्या रोहित शर्मा आणि शिखर धवन यांना चांगला खेळ करता आला नाही. दोघेही लवकरच माघारी परतले. रोहितने २० रन्स केले तर शिखर धवनने केवळ ८ रन्स केले.


त्यानंतर मैदनात आलेला टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याने धडाकेबाज बॅटिंग केली आणि १२५ बॉल्समध्ये १२१ रन्स केले.


केदार जाधवने १२ रन्स, कार्तिकने ३७ रन्स, धोनीने २५ रन्स, हार्दिक पांड्याने १६ रन्स केले.


न्यूझीलंडच्या टीमकडून बोल्टने सर्वाधिक म्हणजेच चार विकेट्स घेतले. टीम साऊदीने तीन विकेट्स घेतले. तर, मिशेल सँटेनर याने एक विकेट घेतला.