नेपियर: भारत आणि न्युझीलंडच्या एकदिवसीय सामन्यात युजवेंद्र चहलने एकोणीसव्या षटकात भारताला चौथा विकेट मिळवून दिला आहे. चहलने टॉम लाथमचा विकेट  घेतला आहे. लाथम १० चेंडूचा सामना करत ११ रन केले. न्युझीलंड  77/4 (19 ओव्हर)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि न्युझीलंडमध्ये सुरु असलेल्या एकदिवसीय पहिल्या सामन्यात युजवेंद्र चहलने भारतीय संघाला तिसरा विकेट मिळवून दिला. खतरनाक फलंदाज रॉज टेलर याला स्वत:च्या गोलंदाजीवर झेल घेवून न्युझीलंड संघासाठी अडचण निर्माण केली आहे. टेलरने ४१ चेंडूचा सामना ३ चौकारच्या मदतीने २४ रन केले. 


मोहम्मद शामी ने इनिंगच्या चौथ्या ओव्हरमध्ये कोलिंग मुनरोला बोल्डकरुन न्युझीलंडला दुसरा झटका दिला. मुनरो ने दोन चौकारच्या मारुन ८ रन केले. न्यूझीलंड 18/2 (4 ओव्हर)


मोहम्मद शामीने त्याच्या दुसऱ्या षटकात  मार्टिन गप्टीलच्या रुपात  न्युझीलंड संघाला पहिला झटका दिला. गप्टिलने ५ रन केले. न्युझीलंड 5/1 (2 ओव्हर)


भारतीय संघासाठी भुवनेश्वर कुमारने पहिली ओव्हर फेकली.  न्युझीलंड संघाला मुनरो आणि मार्टिन गप्टील ने सलामी दिली. न्यूझीलंड 5/0 (1 ओव्हर)
 
न्युझीलंड संघाने नाणे फेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय केला आहे. भारतीय संघ या सामन्यात दोन स्पिनर घेवून उतरणार आहे.  कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या दोघांचा संघात समावेश करण्यात आला आहे.


भारतीय संघाला मागच्या मालेकेच्या तुलनेत जास्त मेहनत करावी लागणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकदिवसीय सामन्यात जसप्रीत बुमराहला विश्राम दिला होता. या मालिकेत त्यांची संघात निवड झाली आहे. त्याचबरोबर भारतीय संघाचे माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी यांचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील चांगल्या कामगिरीमुळे सर्वांच्या नजरा त्यांच्यावर असतील. 
 
 भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार) रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायडू,  केदार जाधव, एमएस धोनी, विजय शंकर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल,  भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.


न्युझीलंड संघ: केन विलियम्सन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, डग ब्रेसवेल, रॉस टेलर, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गप्टिल, टॉम लाथम, कॉलिन मुनरो, हेनरी निकोल्स, मिचेल सैंटनर, टिम साउदी.