नवी दिल्ली : 'कॅचेज विन मॅचेज' अशी एक म्हण क्रिकेटविश्वात प्रचलित आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा खूप कॅच यादगार झाल्या आहेत. १९८३ च्या वर्ल्ड कपमध्ये कपिल देव ने घेतलेली कॅच, १९९६ वर्ल्ड कप मध्ये जॉंटी रोड्सने घेतलेली कॅच सर्वांच्याच लक्षात राहिल्या. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पाचव्या वनडे मध्ये जसप्रीत बुमराहने असाच एक कॅच घेतला आहे. या कॅचमध्ये त्याच्या नशिबाची तितकीच साथ दिली आहे. कारण बॉल हा शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या हातात निटसा आला नव्हता. जमिनीवर पडण्याआधीच बुमराहने त्याला वरच्यावर झेलले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात मनीष पांडेनेही अशी कॅच घेतली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


झेल वर शंका मैदानातील पंचाना शंका आल्याने निर्णय थर्ड अंपायरकडे पाठविण्यात आला. पण थर्ड अंपायरनेही बुमराहच्या बाजूनेच निर्णय दिला आणि 
ऍरॉन फिंचच्या रूपाने भारताला पहिला विकेट मिळाला.