नवी दिल्ली : ओपनर उस्मान ख्वाजाच्या शतकानंतरही भारतीय बॉलरनी ऑस्ट्रेलियाला रोखलं आहे. शेवटच्या वनडेमध्ये टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतलेल्या ऑस्ट्रेलियाला ५० ओव्हरमध्ये २७२/९ पर्यंत मजल मारता आली. ओपनर उस्मान ख्वाजाने १०६ बॉलमध्ये १०० रनची खेळी केली. तर पीटरहॅण्ड्सकॉम्बने ६० बॉलमध्ये ५२ रन केले. भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजाला प्रत्येकी दोन-दोन विकेट मिळाल्या. कुलदीप यादवला एक विकेट घेण्यात यश आलं. तर ऑस्ट्रेलियाचा एक बॅट्समन रनआऊट झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

५ मॅचच्या या सीरिजमधल्या पहिल्या दोन मॅच भारताने जिंकल्या. यानंतर पुढच्या दोन मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय झाला. यामुळे वनडे सीरिज सध्या दोन-दोनने बरोबरीत आहे. या मॅचमध्ये ज्या टीमचा विजय होईल ती टीम सीरिजवर कब्जा करेल. २०१५ नंतर भारताने मायदेशामध्ये एकही सीरिज गमावलेली नाही. त्यामुळे हे रेकॉर्ड कायम ठेवण्याचं आव्हान भारतापुढे असणार आहे.


वर्ल्ड कपआधीची ही भारताची शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच आहे. या मॅचनंतर भारतीय खेळाडू आयपीएलमध्ये खेळतील. यानंतर भारतीय टीम वर्ल्ड कपसाठी इंग्लंडला रवाना होईल. ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. २३ मार्चपासून आयपीएलला सुरुवात होईल.