मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्ध प्रथम कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली गेली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध 17 डिसेंबरपासून पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. पहिला कसोटी सामना एडिलेडमध्ये डे-नाईट खेळला जाईल. ओपनिंगची जबाबदारी पृथ्वी शॉ सह मयांक अग्रवालकडे असणार आहे. त्याचबरोबर हनुमा विहारीलाही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. केएल राहुलला ही कसोटी संघात स्थान मिळालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संघ व्यवस्थापनाने ऋद्धिमान साहावर विश्वास दाखवला आहे. त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले. आर अश्विनला फिरकी अष्टपैलू म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. पहिल्या कसोटी सामन्यात मयंक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ सलामीला येणार आहेत तर चेतेश्वर पुजारा तिसर्‍या क्रमांकावर येणार आहे.


कर्णधार विराट कोहली स्वत: चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येईल, तर पाचव्या क्रमांकावर अजिंक्य रहाणे येईल. जो संघाचा उपकर्णधारही आहे. हनुमा विहारी संघात फलंदाजीसाठी सहाव्या क्रमांकावर येईल तर सातव्या क्रमांकावर फिरकी गोलंदाज आर. अश्विन आहे. तो संघात प्रमुख फिरकीपटूचीही भूमिका साकारेल. वेगवान गोलंदाज म्हणून अनुभवी उमेश यादवला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे, तर मो. शमी आणि जसप्रीत बुमराह देखील खेळणार आहे.



पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय टीम


मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), आर अश्विन, उमेश यादव, मो. शमी, जसप्रीत बुमराह.


कसोटी क्रिकेट इतिहासात प्रथमच भारत आणि ऑस्ट्रेलिया डे-नाईट कसोटी सामने खेळणार आहेत. या सामन्यात विराट कोहली संघाचा कर्णधार असेल, परंतु त्यानंतर तो भारतात परत येईल आणि त्यानंतर पुढील तीन सामन्यांमध्ये संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर येणार आहे.