मोहाली : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये ३५८ रन करूनही भारताचा पराभव झाला. पण या मॅचमध्ये रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी वेगवेगळी रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केली. या मॅचमध्ये रोहित शर्मानं ९२ बॉलमध्ये ९५ रन केले, यामझ्ये रोहितनं २ सिक्स लगावले. याचबरोबर रोहित वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स लगावणारा भारतीय खेळाडू बनला आहे. रोहित शर्माच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये आता २१८ सिक्स आहेत. तर धोनीच्या नावावर २१७ सिक्सचं रेकॉर्ड आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं वनडे क्रिकेटमध्ये १९५ सिक्स मारले.


विराटला मागे टाकून रोहितचा विक्रम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहितनं भारताचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकत नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. रोहित शर्मानं वनडेमध्ये भारतात सगळ्यात जलद ३ हजार रन करण्याचा रेकॉर्ड केला आहे. रोहित शर्मानं ५७ वनडे इनिंगमध्ये हा टप्पा गाठला. मायदेशामध्ये सगळ्यात जलद ३ हजार रन करण्याच्या विक्रमाशीही रोहितनं बरोबरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या हशीम अमलानंही ५७ वनडे इनिंगमध्ये ३ हजार रन पूर्ण केले होते.


भारतामध्ये सगळ्यात जलद ३ हजार रन पूर्ण करण्याचं रेकॉर्ड याआधी कर्णधार विराट कोहलीच्या नावावर होतं. विराट कोहलीनं ६३ वनडे इनिंगमध्ये ३ हजार रन केले होते.


रोहित-शिखरचं रेकॉर्ड


गेल्या काही मॅचपासून रोहित-धवन या जोडीला भारताला चांगली सुरुवात मिळवून देण्यास सातत्याने अपयश येत होते. पण या जोडीने ही उणीव देखील भरुन काढली. या दोघांनी भारताला पहिल्या विकेटसाठी १९३ रनची पार्टनरशीप मिळवून दिली. यामुळे ही पहिल्या विकेटसाठीची पार्टनरशीप आतापर्यंतची ऑस्ट्रेलियाविरुद्धची विक्रमी पार्टनरशीप ठरली.


याआधी देखील ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलामी विक्रमी पार्टनरशीपचा रेकॉर्ड धवन-रोहित या जोडीच्या नावे होता. या जोडीने २०१३ ला नागपूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये १७८ रनची पार्टनरशीप केली होती.


रोहित-धवन या जोडीने आतापर्यंत एकत्र खेळताना एकूण ४,५७१ रनची पार्टनरशीप केली आहे. या पार्टनरशीपमुळे रोहित-धवनने सचिन-सेहवाग या जोडीला मागे टाकले आहे. सचिन-सेहवाग या जोडीने आपल्या कारकिर्दीत एकत्र खेळताना एकूण ४,३८७ रनची पार्टनरशीप केली होती. पार्टनरशीरपच्या बाबतीत भारताकडून सर्वाधिक रनचा विक्रम हा गांगुली-सचिन या जोडीच्या नावे आहे. या जोडीने पार्टनरशीप करताना एकूण ८,२२७ रन केल्या होत्या.


सचिन-सेहवाग या जोडीने ११४ इनिंगमध्ये ४,३८७ रन केले होते. तर रोहित-धवनच्या जोडीने फक्त १०२ इनिंगमध्येच हे रेकॉर्ड केलं आहे.