नागपूर : विराट कोहलीच्या झुंजार शतकामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताची लाज राखली आहे. विराटच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २५१ रनचं आव्हान दिलं आहे. भारताचा ४८.२ ओव्हरमध्ये २५० रनवर ऑलआऊट झाला. विराट कोहलीनं १२० बॉलमध्ये ११६ रनची खेळी केली. यामध्ये १० फोरचा समावेश होता. विराट कोहलीचं वनडे क्रिकेटमधलं हे ४०वं शतक होतं. नागपूरच्या या कठीण खेळपट्टीवर भारताचे इतर बॅट्समन अपयशी ठरले असताना विराटनं मात्र आपण सर्वश्रेष्ठ का आहोत हे दाखवून दिलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचमध्ये टॉस जिंकून ऑस्ट्रेलियानं पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या बॉलरनी त्यांचा कर्णधार एरॉन फिंचचा निर्णय योग्य ठरवला. शून्य रनवरच रोहित शर्मा आऊट झाला. यानंतर भारताची पडझड सुरूच होती. पण विराटनं विजय शंकरच्या मदतीनं ही पडझड थांबवली. विजय शंकर ४१ बॉलमध्ये ४६ रन करून आऊट झाला. विराट कोहलीनं मारलेल्या स्ट्रेट ड्राईव्ह ऍडम झम्पाच्या हाताला लागून मग स्टम्पला लागल्यामुळे विजय शंकरला पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं. मागच्या काही दिवसांपासून फॉर्ममध्ये असलेला धोनी या मॅचमध्ये पहिल्याच बॉलला आऊट झाला. रोहित, धोनी आणि जसप्रीत बुमराह हे तीन भारतीय खेळाडू शून्यवर आऊट झाले.


ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सनं सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. तर ऍडम झम्पाला २ विकेट मिळाल्या. नॅथन कुल्टर नाईल ग्लेन मॅक्सवेल आणि नॅथन लायनला प्रत्येकी १-१ विकेट घेण्यात यश आलं.


५ वनडे मॅचच्या या सीरिजमधली पहिली मॅच भारतानं ६ विकेटनं जिंकली होती. आता दुसऱ्या मॅचमध्येही विजय मिळवून २-०नं आघाडी घेण्याचा भारतीय टीमचा प्रयत्न असेल. 


लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा