INDvsBan : भारत आणि बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने आपली पकड मजबूत केली आहे. भारताने पहिल्या डावात 404 धावांचा डोंगर उभा केला होता. मात्र बांगलादेशने कुलदीप यादवसमोर शरणागती पत्करली. यादवच्या 5  विकेट्स आणि मोहम्मद सिराजच्या 3 विकेट्समुळे बांगलादेश अवघ्या 150 धावा करू शकला. त्यामुळे भारताकडे 258 धावांची आघाडी होती. दुसऱ्या डावामध्ये भारताने 258 वर डाव घोषित केला. आता बांगलादेशपुढे 512 धावांचं आव्हान आहे. चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिल या दोघांच्या शतकी खेळीने मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारली. (indvsban First Test match against India vs Bangladesh latest marathi sport news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या डावामध्ये कर्णधार के. एल. राहुल 23 धावांवर बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या चेतेश्वर पुजारा आणि शुभमन गिल यांनी बांगलादेशच्या गोलंदाजांचा घाम काढला. पुजाराने 130 चेंडूत 102 धावा केल्या आहेत. या खेळीमध्ये त्याने 13 चौकार मारले, युवा शुभमन गिलनेही आपलं पहिलं शतक झळकवलं आहे. 152 चेंडूंमध्ये 110 धावांची खेळी केली. 


चेतेश्वर पुजाराची फलंदाजी सर्वांना माहित आहे. सुरूवातीला तो गोलंदाजांचा चांगलं पिसून घेतो आणि धावफलकही हलता ठेवतो. मात्र आज पुजाराचंं वेगळं रूप पाहायला मिळालं. 50 किंवा 60 चेंडू खेळूनही पुजारा 2 किंवा 4 धावा करायचा. पुजाराने त्याचं 18 वं शतक केलं, विशेष म्हणजे कारकिर्दीतील पुजाराचं हे सर्वात वेगवान शतक ठरलं आहे. 


दरम्यान, भारताने डाव घोषित केल्यावर विराट कोहली (Virat Kohli) नाबाद 19 आणि चेतेश्वर पुजारा नाबाद 102 (Cheteshwar Pujara) होते. बांगलादेशनेही सावध सुरूवात केली आहे. 42 धावा झाल्या असून बांगलादेशने एकही विकेट गमावली नाही. भारताला आता दोन दिवसात बांगलादेशला ऑल आऊट करत सामना जिंकायचा आहे.