INDvsSA: भारत-दक्षिण आफ्रिका मॅचवर पावसाचं सावट
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या टेस्ट मॅचवर पावसाचं संकट आलं आहे.
केपटाऊन : टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या टेस्ट मॅचवर पावसाचं संकट आलं आहे.
सध्या केपटाऊनमध्ये पाऊस पडत आहे त्यामुळे मॅच सुरु होण्यास उशीर होत आहे. मैदानातील पिच कव्हर करण्यात आलं आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये तिसरा दिवस फारच महत्वाचा आहे. तिसऱ्या दिवशी सर्वांचं लक्ष टीम इंडियाच्या आक्रमणावर असणार आहे.
मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये दक्षिण आफ्रिकन टीम २८६ रन्सवर ऑल आऊट झाली. त्यानंतर मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने २०९ रन्स केले आणि त्यामुळे आफ्रिकन टीमला ७७ रन्सची आघाडी मिळाली होती.
दक्षिण आफ्रिकन टीमच्या दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियाच्या फास्ट बॉलर्सने चांगली सुरुवात केली आणि दोन बॅट्समनला हार्दिक पांड्याने माघारी धाडले. सध्या दक्षिण आफ्रिकन टीमने २ विकेट्स गमावत ६५ रन्स केले आहेत. तसेच दक्षिण आफ्रिकेने १४२ रन्सची आघाडी घेतली आहे.