जोहान्सबर्ग : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिसऱ्या दिवशी टीम इंडिया २४७ रन्सवर ऑल आऊट झाली आणि दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी २४१ रन्सचं आव्हान दिलं आहे. टीम इंडियाने केलेल्या या स्कोअरमुळे भारताला विजयाच्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.


हे पण पाहा: INDvsSA: विराट कोहलीने धोनी-गावस्करचा 'हा' रेकॉर्ड मोडला


खराब खेळपट्टीमुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिवस अखेरीस दक्षिण आफ्रिकेने १७ रन्सवर एक विकेट गमावला आहे. दक्षिण आफ्रिकेला अद्यापही विजयासाठी २२४ रन्सची आवश्यकता आहे आणि त्यांच्याकडे ९ विकेट्सही आहेत.


टीम इंडियाने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेचा पहिला विकेट लवकरच आऊट झाला. मार्कराम हा केवळ ४ रन्स करुन माघारी परतला. मोहम्मद शमीने त्याची विकेट घेतली.


हे पण पाहा: INDvsSA: तिसरी टेस्ट मॅच रंगतदार अवस्थेत


तिसऱ्या टेस्ट मॅचच्या दुसऱ्या इनिंगमध्ये टीम इंडियातील विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि भुवनेश्वरने झुंजार खेळी खेळली.


विराट कोहलीने ४१ रन्स केले, रहाणेने ४८ रन्स तर भुवनेश्वर कुमारने ३३ रन्सची इनिंग खेळली. त्यामुळे टीम इंडियाला चांगला स्कोअर करण्यात यश आलं.


दक्षिण आफ्रिकेच्या टीमकडून वर्नेन फिलँडर, रबाडा आणि मॉर्केल यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट्स घेतले.