INDvsSA : आफ्रिकेच्या धरतीवर शतक लगावून स्मृतीने रचला इतिहास....
भारतीय क्रिकेट संघ परदेशी जमिनीवर धमाल कामगिरी करत आहे. आफ्रिकेविरूद्ध पहिला सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यातही आपला फॉर्म कायम राखला आहे. आफ्रिकातील किंबर्ले येथील दुसऱ्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. सुरवातीला वाटले की टीम इंडिया मोठा स्कोअर करणार ननाही. पण सलामीवीर स्मृती मानधनाच्या शानदार शतकाच्या जोरावर भारतीय संघाने ३०० च्या पार आकडा नेला आणि या सामन्यात स्मृतीने आपल्या नावावर विक्रमही केला.
किंबर्ली : भारतीय क्रिकेट संघ परदेशी जमिनीवर धमाल कामगिरी करत आहे. आफ्रिकेविरूद्ध पहिला सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यातही आपला फॉर्म कायम राखला आहे. आफ्रिकातील किंबर्ले येथील दुसऱ्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. सुरवातीला वाटले की टीम इंडिया मोठा स्कोअर करणार ननाही. पण सलामीवीर स्मृती मानधनाच्या शानदार शतकाच्या जोरावर भारतीय संघाने ३०० च्या पार आकडा नेला आणि या सामन्यात स्मृतीने आपल्या नावावर विक्रमही केला.
पहिला धक्का बसूनही...
स्मृतीने १२९ चेंडूत १३५ धावा करून बाद झाली. यापूर्वी भारताल ५६ धावेवर पहिला झटका बसला. पूनम राऊत २० धावांवर बाद झाली. कर्णधार मिताली राजही २० धावा काढून बाद झाली. त्यानंतर स्मृती आणि हरमनप्रीत कौर यांनी १३४ धावांची भागीदारी केली.
पहिली भारतीय महिला...
स्मृीतने १२९ चेंडूत १४ चौकार आणि १ षटकारासह १३५ धावा केल्या. ती भारताची एकमेव अशी खेळाडू झाली आहे की तिने तीन वेगवेगवेळ्या देशात यजमानांविरुद्ध शतक झळकावले आहे. यापूर्वी स्मृति इंग्लड आणि ऑस्ट्रेलियात शतक केले आहे.
कृष्णमूर्तीची फटकेबाजी...
स्मृती बाद झाल्यानंतर हरमनप्रीत आणि व्ही कृष्णमूर्ती यांनी धमाकेदार खेळीनंतर भारताचा स्कोअर ३०० पार गेला. हरमनने ६९ चेंडूत ५५ धावा आणि कृष्णामूर्तीने ३३ चेंडूत ५१ धावा केल्या. यात तीने ६ चौकार आणि १ षटकार लगावले.
भारताचा दणदणीत विजय...
दरम्यान हा सामना भारताने १७८ धावांनी विजय मिळवला. भारताच्या ३०३ धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ १२४ धावांच गारद झाला.