नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला लागोपाठ दोन टेस्ट सामन्यांमध्ये मात देऊन सीरिजमध्ये ०-२ ने मागे टाकलंय. या पराभवानंतर टीम इंडियावर भलेही जोरदार टीका होत असली तरी आकडेवारी आणि इतिहास सांगतो की, तिसरी टेस्ट वेगळी होणार आहे. 


कुठे होणार तिसरा सामना?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या मैदानावर आता तिसरा सामना होणार आहे त्या मैदानावर टीम इंडियाला नाहीतर दक्षिण आफ्रिकेचा भीती वाटायला हवी. या मैदानावरील आकडेवारी एक नजर टाकली तर तुमच्या हे लक्षात येईल. सीरिजमधील शेवटचा आणि तिसरा सामना २४ जानेवारीला जोहानिसबर्गच्या बांडर्रस मैदानावर होणार आहे. 


इथे किती सामने खेळले?


भलेही टीम इंडिया सीरिजमध्ये मागे पडली आहे. टीम इंडियाचं २५ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेत सीरिज जिंकण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही, पण दक्षिण आफ्रिकेला ते जोहानिसबर्गमध्ये उत्तर देण्यासाठी सज्ज आहेत. या मैदानावर टीम इंडियाने आत्तापर्यंत चार सामने खेळले आहेत. डरबन आणि केपटाऊननंतर जोहानिसबर्गमध्ये टीम इंडियाने सर्वात जास्त सामने खेळले आहेत. 


किती सामने जिंकले?


जोहानिसबर्गच्या मैदानावर टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेसोबत चारदा सामना झाला. यात एकदा टीम इंडियाला विजय मिळाला आहे आणि बाकीचे सामने ड्रॉ झालेत. यावेळी टीम इंडियाची ही पाचवी भिडत आहे. 


या मैदाना व्यतिरीक्त दक्षिण आफ्रिकेमध्ये असं एकही मैदान नाहीये जिथे टीम इंडियाचा पराभव झाला नाही. डरबन आणि केपटाऊनमध्ये टीम इंडियाने ५-५ सामने खेळले. डरबनमध्ये ५ पैकी ३ सामन्यात पराभव, १ विजयी आणि १ ड्रॉ झाला. तेच केपटाऊनमध्ये टीम इंडियाला ५ पैकी ३ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. तर दोन सामने ड्रॉ झालेत. 


का आहे रेकॉर्ड?


टीम इंडिया या मैदानावरील ८ इनिंगमध्ये केवळ १ वेळा टीम इंडिया ऑलआऊट झाली आहे. त्याव्यतिरीक्त टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज कधीही ऑलआऊट करू शकले नाही. दक्षिण आफ्रिकेत आत्तापर्यंत १४ शतकं लगावण्यात आले आहेत. त्यात ४ शतकं टीम इंडियाकडून लगावण्यात आले.