INDvsSA: विराट कोहलीने धोनी-गावस्करचा `हा` रेकॉर्ड मोडला
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये कॅप्टन विराट कोहलीने एक नवा कारनामा केला आहे.
नवी दिल्ली : टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये कॅप्टन विराट कोहलीने एक नवा कारनामा केला आहे.
तिसरी टेस्ट मॅच ज्या मैदानात होत आहे तो पिच सर्वात कठीण पिच असल्याचं म्हटलं जातं. मात्र, याच पिचवर विराट कोहलीने चांगली बॅटिंग करत आपली क्षमता सिद्ध केली आहे. या सीरिजमध्ये टीम इंडियाने दुसऱ्या इनिंगमध्ये सर्वाधिक रन्स विराट कोहलीने केले आहेत.
विराट कोहलीने या सीरिजमध्ये आतापर्यंत २८६ रन्स बनवले आहेत. त्यानंतर आफ्रिकेच्या एबी डिविलियर्सचं नाव आहे. मात्र, डिविलियर्स खूपच मागे आहे. चौथ्या इनिंगमध्ये डिविलियर्सने जर ८० रन्सची इनिंग खेळली तर तो विराटला मागे टाकू शकेल.
आपल्या नावावर केला नवा रेकॉर्ड
मॅचच्या दुसऱ्या इनिंगमध्ये विराटने ४१ रन्सची इनिंग खेळत टीम इंडियाकडून कॅप्टन म्हणून सर्वाधिक रन्स बनवण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड एमएस धोनीच्या नावावर होता. तर, त्यापूर्वी सुनील गावस्करच्या नावावर होता.
सुनील गावस्करने कॅप्टन असताना ३४५४ रन्स बनवले होते. तर मोहम्मद अजहरुद्दीनने २८५६ टेस्ट रन्स बनवले होते.
या सीरिजमध्ये विराट कोहलीने एक सेंच्युरी आणि एक हाफ सेंच्युरी करत २८६ रन्स बनवले आहेत. दुसऱ्या टेस्टमध्ये विराटने १५३ रन्सची शानदार इनिंग खेळली होती. यासोबतच सचिन तेंडुलकर नंतर तो दुसरा बॅट्समन बनला आहे ज्याने आफ्रिकेत दोन सेंच्युरी लगावल्या आहेत. विराटने २०१३ मध्ये जोहान्सबर्गमध्ये एक सेंच्युरी लगावली होती.