जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरोधात झालेल्या चौथ्या वन-डे मॅचमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सहा मॅचेसच्या सीरिजमध्ये टीम इंडियाने चौथी वन-डे मॅच जिंकली असती तर सीरिजही आपल्या नावावर केली असती. कारण, टीम इंडियाने यापूर्वीच तीन मॅचस जिंकल्या आहेत. 


दक्षिण आफ्रिकेच्या टीमने ५ विकेट्सने ही मॅच जिंकली आहे. या मॅचमध्ये पावसाचाही व्यत्यय आला होता. तसेच युजवेंद्र चहल याने केलेली एक चूकही टीम इंडियाला महागात पडली. 


जोहान्सबर्गमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आणि त्यामध्ये भारतीय बॉलर्सची खराब बॉलिंग एक कारण मानलं जात आहे.


भारताने ५० ओव्हर्समध्ये २८९ रन्स केले. त्यानंतर पावसाचा व्यत्यय आल्याने मॅचवर परिणाम झाला. यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या टीम समोर २८ ओव्हर्समध्ये २०२ रन्स बनवण्याचं आव्हान होतं. आफ्रिकेच्या बॉलर्सने जितकी चांगली बॅटींग केली तितकीच खराब बॉलिंग भारतीय बॉलर्सने केली. 


या सीरिजमध्ये युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्या बॉलिंगवर आफ्रिकन बॅट्समनने चांगलीच फटकेबाजी केली. चौथ्या वन-डे मध्ये चहलने केलेल्या एका चुकीमुळे मॅचचा निर्णयच बदलला.


मॅचची १८वी ओव्हर चहल टाकत होता. त्या दरम्यान आफ्रिकन टीमला ६० बॉल्समध्ये ९४ रन्स बनवायचे होते. ओव्हरच्या पाचव्या बॉलवर खेळताना मिलर आऊट झाला. आफ्रिकेवर संकट ओढावत असल्याचं दिसलं. मात्र, अंपायरने रिप्ले पाहताच तो नो बॉल असल्याचं दिसलं. त्यावेळी मिलर ७ रन्सवर खेळत होता.



मिलरने २८ बॉल्समध्ये ३९ रन्सची इनिंग खेळली आणि टीमला विजयाजवळ पोहोचवण्यास मदत केली. त्यानंतर फेहलुकवायो आणि क्लासेनने आफ्रिकनच टीमला विजय मिळवून दिला. 


यापूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जसप्रीत बुमराहने सुद्धा एक नो बॉल टाकला होता त्यावेळी ही टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता.