श्रीलंकन टीमने वाढवली विराटची चिंता
श्रीलंकेविरोधात सीरिज सुरु होण्यापूर्वी टीम इंडियाला एक जोरदार झटका लागला आहे
नवी दिल्ली : टीम इंडियाने न्यूझीलंडविरोधात टीम इंडियाने सीरिज जिंकल्यानंतर आता श्रीलंकेविरोधात सीरिज सुरु होणार आहे. मात्र, ही सीरिज सुरु होण्यापूर्वी टीम इंडियाला एक जोरदार झटका लागला आहे.
न्यूझीलंडविरोधात केलेल्या चांगल्या प्रदर्शनामुळे टीम इंडियाने सीरिज आपल्या नावावर केली. यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास खूपच वाढला आहे.
श्रीलंकन टीमसोबत टेस्ट मॅच सुरु होण्यापूर्वी भारतीय टीम आणि श्रीलंकन टीम यांच्यात एक प्रॅक्टीस मॅच सुरु आहे. मात्र, या मॅचच्या पहिल्या दिवशीच श्रीलंकन टीमने विराट कोहलीची चिंता वाढवली आहे.
या प्रॅक्टीस मॅचच्या पहिल्या दिवशी श्रीलंकन टीमने ६ विकेट्स गमावत ४११ रन्स बनवले. यामुळे टीम इंडियाची चिंता वाढली आहे.
प्रॅक्टीस मॅचमध्ये श्रीलंकेच्या टीमने चांगली कामगिरी केली आहे. या मॅचमध्ये श्रीलंकेच्या टॉप सहापैकी चार बॅट्समनने हाफ सेंच्युरी लगावली. त्यामुळे आगामी सीरिजमध्ये श्रीलंकन टीम विराट सेनेला टक्कर देण्यासाठी तयार असल्याचं स्पष्ट आहे.
श्रीलंकेच्या टीमकडून ओपनिंगसाठी आलेल्या करुणारत्ने आणि समरविकरामा यांनी १३४ रन्सची पार्टनरशीप केली. करुणारत्ने ५० रन्स करुन रिटायर्ड हर्ट झाला तर समरविकरामा ७४ रन्स करुन आऊट झाला.
भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिली टेस्ट मॅच १६ नोव्हेंबर रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळली जाणार आहे.