धरमशाला : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्याच वन-डे मॅचमध्ये भारताचा लाजीरवाणा पराभव झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाने ५० ओव्हर्समध्ये केलेल्या ११२ रन्सचा टप्पा श्रीलंकन टीमने अवघ्या २०.४ ओव्हर्समध्ये गाठला आहे. या विजयासोबतच तीन मॅचेसच्या वन-डे सीरिजमध्ये श्रीलंकेने १-०ने आघाडी घेतली आहे.


मॅचच्या सुरुवातीला श्रीलंकेने टॉस जिंकत प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात बॅटिंगसाठी आलेल्या टीम इंडियाला चांगला स्कोअर करण्यात अपयश आलं.


टीम इंडियाकडून महेंद्रसिंग धोनी वगळता एकाही बॅट्समनला चांगला स्कोअर करता आला नाही. महेंद्रसिंग धोनीने ८७ बॉल्समध्ये ६५ रन्स केले. तर, कुलदीप यादवने २५ बॉल्समध्ये १९ रन्स केले.


श्रीलंकन टीमकडून सुरंगा लकमलने १० ओव्हर्समध्ये १३ रन्स देत ४ विकेट्स घेतले. न्यूवान प्रदीपने दोन विकेट्स घेतले. तर, मॅथ्यूज, परेरा, धनंजया आणि पथिराणा यांनी प्र्तेयकी एक-एक विकेट घेतले.


टीम इंडिया ३८.२ ओव्हर्समध्ये ११२ रन्स करत ऑल आऊट झाली. त्यामुळे श्रीलंकन टीमला ५० ओव्हर्समध्ये अवघ्या ११३ रन्सचं आव्हान मिळालं.


टीम इंडियाने केलेला स्कोर पार करण्यासाठी श्रीलंकन टीम मैदानात उतरली. श्रीलंकेच्या टीमलाही सुरुवातीलाच टीम इंडियाने झटके दिले. मात्र, श्रीलंकेने ३ विकेट्स गमावत ११४ रन्स केले आणि सीरिजमध्ये विजयी सलामी दिली.


टीम इंडियाकडून भुवनेश्वर कुमार, बुमराह आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतले.