मुंबई : पहिल्या टी-२० मॅचमध्ये विजय मिळविल्यानंतर आता दुसऱ्या मॅचमध्येही टीम इंडियाने ८८ रन्सने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासोबतच टीम इंडियाने सीरिजही आपल्या नावावर केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचं शानदार प्रदर्शन सुरुच असल्याचं दिसत आहे. टीम इंडियाने श्रीलंकेवर ८८ रन्सने विजय मिळवला आहे. या मॅचमध्ये खऱ्या अर्थाने चार प्लेअर्सने मोलाची कामगिरी केली आहे. पाहूयात टीम इंडियाचे हे ४ हिरो कोण आहेत ते...


रोहित शर्माने केली सर्वाधिक वेगाने सेंच्युरी


टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने वन-डे सोबतच टीम-२० क्रिकेटमध्येही आपलं प्रदर्शन कायम राखलं आहे. वन-डे क्रिकेटमध्ये तीन डबल सेंच्युरी केलेल्या रोहित शर्माने इंदूर येथील मॅचमध्ये अवघ्या ३५ बॉल्समध्ये सेंच्युरी लगावली आहे. यासोबतच रोहितने आपल्या नावावर एक नाव रेकॉर्ड केला आहे. 


रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेच्या डेविड मिलर याच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. डेविड मिलर याने २९ ऑक्टोबर रोजी बांगलादेश विरोधात खेळताना ३५ बॉल्समध्ये सेंच्युरी लगावली होती. 


केएल राहुलची मोठी पार्टनरशीप


रोहित शर्मासोबत खेळताना केएल राहुल यानेही चांगला परफॉर्मन्स दाखवला. राहुलने ८९ रन्सची इनिंग खेळली. त्याने ४९ बॉल्समध्ये ८९ रन्स केले. यासोबतच राहुलने रोहित शर्मासोबत पहिल्या विकेटसाठी १६५ रन्सची पार्टनरशीप केली. 


कुलदीप यादवने एका ओव्हरमध्ये घेतले ३ विकेट्स


टीम इंडियाचा चायनामॅन म्हटलं जात असलेल्या कुलदीप यादव याने श्रीलंकन टीमला चांगलच गारद केलं. कुलदीप यादवने चांगल्या फॉर्मात असलेल्या परेराचा विकेट घेतला. मॅचच्या १५व्या ओव्हरमध्ये कुल्दीपने ६ रन्स देत तीन विकेट्स् घेतले. 


युजवेंद्र चहलने लगावला चौका


कुलदीप यादवनंतर युजवेंद्र चहल यानेही जबरदस्त बॉलिंगचं प्रदर्शन दाखवलं आणि श्रीलंकन टीमच्या अपेक्षांवर पाणी फेरलं. चहलने या मॅचमध्ये ४ ओव्हर्समध्ये ५२ रन्स देत ४ विकेट्स घेतले.