मुंबई : टीम इंडिया झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात टीम इंडिया केएल राहुलच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेला 18 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेपुर्वी एका खेळाडूने भारतीय संघाला मोठा इशारा दिला आहे. हा इशारा आता खरा ठरतोय का हे मालिकेनंतरच कळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाला खेळाडू? 
झिम्बाब्वेचा फलंदाज इनोसेंट कैयाने टीम इंडियाला मोठा इशारा दिला आहे. इनोसेंट कैया म्हणाला की, टीम इंडिया विरूद्घची ही मालिका झिम्बाब्वे 2-1 ने जिंकेल, असे भाकित त्याने वर्तवले आहे. या मालिकेत मी शतक झळकावू शकेन आणि संपूर्ण मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनू, अशी माझी इच्छा असून, हेच माझे ध्येय असल्याचे कैया म्हणाला आहे.  


झिम्बाब्वेचा कर्णधार क्रेग एर्विन आणि इतर खेळाडूंच्या दुखापतीवर कैया म्हणाला की, संघाला काही अडचणी येतील यावर माझा विश्वास नाही. सध्या आमच्या संघात खेळाडू आहेत. संघातून बाहेर पडलेल्या खेळाडूंची जागा घेण्याची क्षमता इतर खेळाडूंमध्ये आहे.  


भारताचं प्रदर्शन
भारताने झिम्बाब्वेमध्ये आतापर्यंत 23 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यादरम्यान संघाने 19 सामने जिंकले आहेत. तर फक्त 4 सामने हरले. टीम इंडिया प्रदीर्घ कालावधीनंतर झिम्बाब्वेमध्ये पोहोचली आहे. भारताने शेवटची वनडे मालिका 2016 मध्ये खेळली होती. यादरम्यान भारताने 3-0 ने विजय मिळवला होता.