मुंबई : मागील काही वर्षांपासून हार्दिक पांण्ड्याने त्याच्या चाहत्यांच्या मनात आपल्या लक्षणीय खेळामुळे जागा निर्माण केली आहे. हार्दिक हा ऑलराउंडर खेळाडू आहे. त्याच्या चाहत्यांना त्याच्यावर इतका विश्वास आहे की, जर एखादा दिग्ज खेळाडू मॅचमध्ये बाद झाला तर त्यांना विश्वास असतो की, हार्दिक अजून सामन्यात यायचा आहे. अगदी पत्यांच्या खेळात आपण हुकुमाचा एक्का लपवून ठेवतो, तसा आणि हार्दिकही त्याच्या चाहत्यांच्या विश्वासावर खरा उतरतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिकने क्रिकेटच्या जगात खूप नाव कमावले आहे. त्याच बरोबर त्याची संपत्तीही प्रचंड वाढली आहे. त्याच्यामुळे त्याने वडोदरामध्ये 6 हजार स्क्वेअर फिट पेन्ट हाऊस विकत घेतलं आहे. या अपार्टमेन्टमध्ये खूप साऱ्या सुविधाही उप्लब्ध आहेत.



हार्दिकचा बेडरुम जर तुम्ही पाहिलात तर त्यामध्ये मॅाडर्न फॅसिलीटी उपलब्ध आहे. तसेच त्याने संपूर्ण बेडरुममध्ये त्याच्या सहखेळाडूंचे फोटो लावले आहेत. त्याचा गेस्ट रूम खूप मोठा आहे आणि त्यामध्ये मोठा टीव्ही आणि सोफा आहे. जो एकदम रॅायल लूक दोतो.


हार्दिक पंड्या आणि त्याचा भाऊ क्रुणाल पांड्या यांना चित्रपट पहायला आवडते हे सर्वांनाच ठाऊक आहे. यामुळेच त्यांच्या घरात खासगी थिएटर (Private Theatre) उपस्थित आहे.



तसेच त्याचा लिविंग रूमही (Living Room) आल्ट्रा मॅाडर्न आहे ज्यामध्ये तो कुठे ही बसून इलेक्ट्रीक गॅजेट वापरु शकतो. हार्दिक पांड्या फिटनेसची ही पूर्ण काळजी घेतो. यामुळेच त्याने आपल्या घरात एक आधुनिक जिम सुद्धा तयार केली आहे.