Rohit Sharma: गेल्या अनेक वर्षांप्रमाणे यंदाही आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने पहिला सामना गमावला. गुजरात टायटन्सने अवघ्या 6 रन्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सच्या टीमने 17 व्या सिझनमधील पहिलाच सामना गमावला. दरम्यान हार्दिकला कर्णधारपदाची धुरा सोपवल्यानंतर रोहित शर्माचे चाहते नाराज होते. आणि अशातच चाहत्यांना ज्याची भीती होती, तीच घटना मैदानावर घडली. 


हार्दिककडून भर मैदानात रोहित शर्माचा अपमान?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममवर गुजरात टायटन्स विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगला होता. दरम्यान यावेळी मॅचमध्ये असे काही सीन्स पाहायला मिळाले, जे पाहून रोहित शर्माचे चाहते चांगलेच संतापले आहेत. मुंबईचा कर्णधार बनताच रोहित शर्माला अयोग्य वागणूक देण्यास सुरुवात केली. सामन्यादरम्यानचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये हार्दिक मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्माला फिल्डींगच्या वेळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सतत पळवताना दिसतोय.


हार्दिक पंड्याचा व्हिडीओ व्हायरल


व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पहिलं तर रोहित शर्मा दुसऱ्या फिल्डिंग पोझिशनवर धावताना दिसतोय. यावेळी रोहित त्याच्या स्थानावर पोहोचतो, मात्र लगेच हार्दिक त्याला जागा बदलण्यास सांगतो. यावेळी रोहित शर्मा पंड्या सांगत असलेल्या दुसऱ्या स्थानावर जातो. हार्दिक पंड्याच्या सांगण्यावरून रोहित शर्माची सुरु असलेली ही धावपळ चाहत्यांना अजिबात आवडलेली नाही. यावेळी चाहते हार्दिकच्या या कृत्यावर चांगलेच संतापले आहेत.



पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव


अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात गुजरातने मुंबई इंडियन्सला पाणी पाजलं आहे. मुंबईच्या या पराभवामुळे गेल्या 11 वर्षांची पराभवाची परंपरा कायम राखली आहे. प्रथम फलंदाजी करत गुजरातने 169 धावांचं आव्हान पलटणला दिलं होतं. त्याचा पाठलाग करताना अखेरच्या ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सला 19 धावांची गरज होती. ही लढत शेवटच्या बॉलपर्यंत रंगली होती.


20 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) सिक्स अन् दुसऱ्या बॉलवर फोर मारला, पण तिसऱ्या बॉलवर पांड्या आऊट झाला. त्यानंतर चौथ्या बॉलवर पियुष चावला बाद झाल्यावर मुंबई ढेपाळली. उमेश यादवने (Umesh Yadav) भेदक गोलंदाजी करत गुजरातच्या पाड्यात सामना फिरवला अन् युवा कॅप्टनच्या (Shubhman Gill) नेतृत्वाखाली गुजरातने पहिला सामना 6 धावांनी जिंकला आहे.