Sport News : टी-20 विश्वचषकाच्या थराराला सुरूवात झाली असून वेस्ट इंडिज, श्रीलंकेसारख्यां तगड्या संघांना लहान संघांनी पाणी पाजलं आहे. आता क्रीडाप्रेमी भारत पाक सामन्याची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. आजच्या सराव सामन्यात भारताच्या शिलेदारांनी यजमानांना पराभवाची धूळ चारली आहे. अशातच भारताचे 'लिटल मास्टर' म्हणून ओळखले जाणारे माजी क्रिकेटपटू  सुनील गावसकर यांनी पाकिस्तानच्या कर्णधाराला कानमंत्र दिला आहे. ( INSvsPAK T20 World Cup 2022 sunil gavaskar on babar azam batting tips latest marathi Sport News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये सुनील गावसकर पाकिस्तानचं रन मशीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्णधार बाबर आझमला कानमंत्र देताना दिसले. बाबर एका खाजगी पार्टीत गासवकर यांना भेटला होता. गावस्करांनी त्याला सही असलेली टोपी दिली आणि बाबरला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या.



नेमका काय दिला कानमंत्र?


जर शॉटची निवड चांगली असेल तर काही अडचण येणार नाही. मात्र परिस्थितीनुसार शॉट निवडा, असं गासवकर म्हणाले. पाकिस्तानच्या कोचिंग स्टाफचे सदस्य सकलेन मुश्ताक आणि मोहम्मद युसूफही यावेळी उपस्थित होते. बाबर आझम गेल्या काही काळापासून उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याची गणना टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये केली जाते.


भारत 23 ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 विश्वचषकात आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. सुपर-12 च्या या गटातील इतर दोन संघ दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश हे आहेत.