टीम इंडियाच्या कोचपदासाठी सोमवारी मुलाखत
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा अनिल कुंबळेने राजीनामा दिल्यानंतर नवीन कोचचा शोध सुरू झाल आहे. टीम इंडियाच्या कोचसाठी १० जणांनी अर्ज केला आहे. यामध्ये रवी शास्त्री, विरेंद्र सेहवाग, क्रेग मॅकडरमोट, लान्स क्लूसनर, राकेश शर्मा, लालचंद राजपूत, फिल सिमंस, टॉम मुडी, डोडा गणेश आणि रिचर्ड पाईब्स यांचा समावेश आहे.
मुंबई : टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा अनिल कुंबळेने राजीनामा दिल्यानंतर नवीन कोचचा शोध सुरू झाल आहे. टीम इंडियाच्या कोचसाठी १० जणांनी अर्ज केला आहे. यामध्ये रवी शास्त्री, विरेंद्र सेहवाग, क्रेग मॅकडरमोट, लान्स क्लूसनर, राकेश शर्मा, लालचंद राजपूत, फिल सिमंस, टॉम मुडी, डोडा गणेश आणि रिचर्ड पाईब्स यांचा समावेश आहे.
उद्या म्हणजे 10 जुलै रोजी दुपारी १ वाजता प्रशिक्षकपदासाठी मुलाखत सुरु होणार आहे. उद्या सेहवास, शास्त्री, पाइब्स, लालचंद राजपूत, सिमंस आणि मुडीचा इंटरव्यू होईल. कोचपदांसाठी मुलाखत क्रिकेट अॅडव्हायझर काऊन्सिल घेणार आहे. यामध्ये सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरव गांगुली हे सदस्य आहेत.
सेहवाग, शास्त्री आणि मुडी यांच्यात टक्कर
कोचपदासाठी जरी अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केला असेल तरी विरेंद्र सेहवाग, टॉम मुडी आणि रवी शास्त्री यांच्यात टक्कर पाहायला मिळणार आहे. रवी शास्त्रीची मुख्य कोचपदी निवड होणे जवळजवळ निश्चित आहे असं म्हटलं जातंय. तरी शेवटचा निर्णय सचिन, सौरव आणि लक्ष्मण यांना घ्यायचा आहे.