आयपीएल २०१८ : टॉप १० सर्वात महागडे खेळाडू
आयपीएल सीजन 2018 चा लिलाव संपला आहे. या लिलावात क्रिकेटरांवर पैशांचा पाऊस झाला.
बंगळुरु : आयपीएल सीजन 2018 चा लिलाव संपला आहे. या लिलावात क्रिकेटरांवर पैशांचा पाऊस झाला.
१० महागडे खेळाडू
१. बेन स्टोक्स : आयपीएलच्या या लिलावात बेन स्टोक्स सर्वात महागडा खेळाडू ठरला. राजस्थान रॉयल्सने 12.5 कोटींना त्याला विकत घेतलं.
२. जयदेव उनादकट : आयपीएल लिलावामधला दुसरा सर्वात महागडा खेळाडू जयदेव ठरला. त्याच्या या किंमतीने सर्वच हैराण झाले. राजस्थानने 11.5 कोटींना त्याला विकत घेतलं.
३. लोकेश राहुल : किंग्स इलेवन पंजाबने लोकेशला 11 कोटींना खरेदी केलं. लोकेश तिसरा सगळ्यात महागडा क्रिकेटर ठरला.
४. मनीष पांडे : पांडे हा लोकेश राहुल प्रमाणे तिसरा महागडा खेळाडू ठरला. सनराइजर्स हैदराबादने 11 कोटींना त्याला खरेदी केलं.
५. क्रिस लिन : कोलकाता नाईट राइडर्सने 9.6 कोटींना लिनला खरेदी केलं.
६. मिशेल स्टार्क : कोलकाता नाईट रायडर्सने 9.4 कोटींना त्याला खरेदी केलं.
७. ग्लेन मॅक्सवेल : दिल्ली डेयरडेविल्सने 9 कोटींना त्याला खरेदी केलं.
८. राशिद खान : सनराइजर्स हैदराबादने राशिदला 9 कोटींना खरेदी केलं.
९. क्रृणाल पंड्या : मुंबई इंडियंसने 8.8 कोटींना क्रृणालला विकत घेतलं.
१०. संजू सॅमसन : राजस्थान रॉयल्सने 8 कोटींना संजूला विकत घेतलं.