IPL ऑक्शनमध्ये पांडेचा जलवा, किंमत ऐकून तुम्ही व्हाल दंग
आपएलच्या ऑक्शनमध्ये भारताकडून मनीष पांडे हा सर्वाधिक महाग खेळाडू ठरला आहे
मुंबई : आपएलच्या ऑक्शनमध्ये भारताकडून मनीष पांडे हा सर्वाधिक महाग खेळाडू ठरला आहे
मनीष पांडेला सनराईजर्स हैदराबादने तब्बल 11 करोड रुपयांना विकत घेतलं आहे. यासोबतच किंग्स इलेव्हन पंजाबचा एल राहुलला देखील 11 करोड रुपयांना विकत घेतलं आहे. मनीष पांडेची किंमत पाहून अनेकजण चकित झाले आहेत.
सोशल मीडियावर प्रश्न विचारले जात आहेत की, मनीष पांडेला भारत वन डे आणि टी 20 टीममध्ये अद्याप जागा पक्की नाही. मग IPL मध्ये एवढ्या महाग किंमतीला का विकत घेतले.
या 10 कारणांमुळे मनीष पांडेची इतकी मोठी बोली लागली
1) मनीष पांडे हा पहिला भारतीय खेळाडू आहे ज्याने IPL मध्ये शतक केलं आहे. या लीगमध्ये तो चांगल प्रदर्शन करत आहे.
2) 2014 च्या फायनलमध्ये तो KKR या विजेत्या टीमचा नायक होता
3) काही दिवसांपूर्वी मनीष पांडेने भारताकडून टी 20 आणि वन डे मध्ये शानदार प्रदर्शन केलं आहे.
4) मनीष पांडेने 103 आयपीएल सामने खेळाले आहेत. या टूर्नामेंटमध्ये तो अनुभवी खेळाडू आहे
5) आयपीएलमध्ये मनीष पांडेने 2215 धावा केल्या आहेत
6) आयपीएलमध्ये मनीष पांडेचा स्ट्राइक रेट 128 च्या वर आहे
7) मनीष पांडेने IPL मध्ये एक शतक आणि 9 अर्धशतक केलं आहे. यामध्ये 64 छक्के आणि 187 चौके लगावले आहेत.
8) आयपीएल 2017 मध्ये मनीष पांडेने जवळपास 50 च्या रनरेटने KKR ला जिंकवलं आहे.
9) मनीष पांडे हा 28 वर्षाचा असून तो पुढील 5 ते 6 वर्ष क्रिकेटसाठी फिट आहे.
10) मनीष पांडे शानदार फिल्डिंगसाठी ओळखला जातो.