नवी दिल्ली : आयपीएलच्या ११व्या मोसमाला सुरुवात झाली असून दुसरा सामना दिल्ली डेअरडेविल्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात होत आहे. चंडीगढमध्ये दिल्ली विरुद्ध पंजाब हा सामाना रंगणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किंग्स इलेव्हन पंजाबने टॉस जिंकन प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबच्या होम ग्राऊंडवर होत असलेल्या याचा फायदा पंजाबला मिळण्याची शक्यता आहे.



आर. अश्विनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाबच्या संघाची लढत गौतम गंभीरच्या दिल्ली डेअरडेविल्स सोबत होत आहे. गेल्या मोसमात चेन्नई सुपरकिंग्समधून खेळलेला आश्विन पंजाबचे नेतृत्व करत आहे.


चेन्नई सुपर किंग्जची विजयी सलामी


आयपीएल ११च्या मोसमातील पहिली मॅच मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या टीम्समध्ये झाली. पहिल्याच मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा पराभव करत आयपीएलमध्ये विजयी सलामी दिली आहे. शेवटच्या ओव्हरपर्यंत झालेली ही मॅच खूपच रंगतदार झाली.     


किंग्स इलेव्हन पंजाबची टीम : आर. अश्विन (कॅप्टन), आरोन फिंच, ख्रिस गेल, मंझूर दार, मार्कस स्टॉइनिस, प्रदीप साहू, युवराज सिंग, अक्षदीप नाथ, डेव्हिड मिलर, करुण नायर, मनोज तिवारी, मयांक अगरवाल, बरिंदर सरन, बेन ड्वारशस, मयांक डागर, मोहित शर्मा, अक्षर पटेल, लोकेश राहुल, अॅड्रू टाय, अंकित राजपूत, मजीब उर रेहमान.


दिल्ली डेअरडेविल्सची टीम : गौतम गंभीर (कॅप्टन), श्रेयस अय्यर, ख्रिस मॉरीस, रिषभ पंत, ग्लेन मॅक्सवेल, जेसन रॉय, पृथ्वी शॉ, राहुल टेवाटिया, विजय शंकर, हर्षल पटेल, अव्हेश खान, कॉलिन मुन्रो, गुरकिरत सिंग मान, ट्रेंट बोल्ट, मनज्योत कालरा अभिषेक शर्मा, मोहम्मद शामी, कागिसो रबाडा, अमित मिश्रा, शाहबाझ नदीम, डॅनियल ख्रिस्टीयन, जयंत यादव, संदीप एल. नमन ओझा, सयन घोष.