आयपीएल २०१८ : चेन्नईच्या संघात तो परत आलाय
टीमचा फास्ट बॉलर लुंगी एन्गीडी लवकरच चेन्नई टीमचा हिस्सा बनणार आहे.
मुंबई : आयपीएलमध्ये मुंबईच्या टीमला आतापर्यंत एकच विजय मिळालाय. त्यांची हाराकिरी सुरूच आहे. अशात त्यांची भिडंत आता चेन्नईच्या संघासोबत होणार आहे. मुंबईला चेन्नईकडूनही धक्का मिळण्याची शक्यता आहे. कारण चेन्नईचा स्टार खेळाडू पुन्हा टीममध्ये येतोय. तसतर चेन्नईच्या खेळाडूंसाठी आयपीएल सीझनची सुरूवात चांगली झाली नाही. त्यांचे काही खेळाडू दुखापतग्रस्त झाले. मिशेल सेंटनर आणि केदार जाधवसारख्या खेळाडूंना दुखापतीमुळे टुर्नामेंटच्या बाहेर बसाव लागलय. टीमचा फास्ट बॉलर लुंगी एन्गीडी लवकरच चेन्नई टीमचा हिस्सा बनणार आहे.
म्हणून गेला होता बाहेर
वडिल वारल्यामुळे तो टुर्नामेंटमध्येच सोडून गेला होता. सुरुवातीला तो प्लेईंग इलेव्हनचा हिस्सा नव्हता. चेन्नईचा शार्दूल ठाकूर आणि दीपक चाहर अपेक्षेप्रमाणे खेळ करत नाहीत. त्यामुळे चेन्नईच्या टीमला मोठ्या संख्येचा पाठलाग करावा लागतोय. अशावेळी महेंद्र सिंह धोनी ताहिरच्या ऐवजी एन्गीडीला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देऊ शकतो.