विशाखापट्टणम : दिल्ली विरुद्ध हैदराबाद यांच्यात आज (८ मे) एलिमिनेटरचा सामना रंगणार आहे. आयपीएलच्या क्वालिफायरमधील आव्हान कायम ठेवण्यासाठी दोन्ही टीमसाठी हा विजय महत्वाचा असणार आहे. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही टीमचे शर्थीचे प्रयत्न करणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी मुंबई विरुद्ध चेन्नई यांच्यात ७ मे ला क्वालिफायरचा पहिला सामना खेळण्यात आला. या सामन्यात मुंबईने चेन्नईचा ६ विकेटने पराभव करत फायनलमध्ये ध़डक मारली. 


चेन्नईच्या पराभवानंतर देखील त्यांना फायनलमध्ये पोहचण्याची संधी असणार आहे. आजच्या एलिमीनेटरच्या सामन्यात जिंकणाऱ्या टीमसोबत चेन्नईचा सामना होईल. 


साखळी फेरीतील शेवटची मॅच मुंबई कोलकाता टीममध्ये खेळण्यात आली. या मॅचमध्ये मुंबईने कोलकाताचा पराभव केला. कोलकाताचा पराभव झाल्याने हैदराबादला त्यांच्या चांगल्या नेट रनरेटच्या जोरावर चौथ्या क्रमांकासाठी स्थान मिळाले.  


या चौथ्या टीमसाठी साखळी फेरीतील शेवटच्या मॅचपर्यंत ३ टीम स्पर्धेत होत्या. पंरतु हैदराबादला त्यांच्या नेटरनरेटच्या जोरावर प्लेऑफमध्ये संधी मिळाली. त्यामुळे १२ अंकावर प्लेऑफसाठी पात्र ठरणारी हैदराबाद पहिलीच टीम ठरली आहे.


दिल्लीने गेल्या अनेक वर्षांनंतर प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे हा सामना जिंकून आपले आव्हान कायम ठेवण्याचा प्रयत्न दिल्लीचा असेल. आजचा एलिमिनेटर सामना जिंकणारी टीम चेन्नई सोबत क्वालिफायर-२ मॅच खेळेल.


दिल्लीच्या शिखर धवनने यंदाच्या मोसमात ४५० रन केले आहेत. तसेच पृथ्वी शॉ, कॅप्टन श्रेयस अय्यर तसेच ऋषभ पंत या खेळाडूंनी निर्णायक खेळी करुन दिल्लीच्या विजयात आतापर्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे या खेळाडूंकडून आजच्या सामन्यात चांगली कामगिरीची अपेक्षा दिल्लीच्या चाहत्यांना असणार आहे.


वर्ल्डकप सरावासाठी डेव्हि़ड वॉर्नर आणि जॉन बेअरेस्टो हे मायदेशी परतले आहेत. त्यामुळे हैदराबादची ताकद कमी झाली आहे. हैदराबादच्या बॉलिंगची जबाबदारी ही रशीद खान, भुवनेश्वर कुमार आणि खलील अहमदच्या खांद्यावर असणार आहे.