मुंबई : यंदाचा आयपीएलचा IPL 2019 हंगाम हा काही कारणांनी खास राहिला. मुख्य म्हणजे हा हंगना जितका मनोरंजक आणि उत्सुकता शिगेला पोहोचवणारा होता तितकाच त्यातील अंतिम सामना हा हृदयाचे ठोके रोखणारा होता. शेवटच्या चेंडूपर्यंत उत्सुकता ताणून धरलेल्या या सामन्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत अनेक असे प्रसंग घडले ज्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. त्यातीलच एक विषय म्हणजे पंचांच्या एका निर्णयावर नाराजी व्यक्त करणाऱ्या कायरन पोलार्डची एक कृती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबईच्या संघाकडून फलंदाजीसीठी आलेल्या पोलार्डने मुंबईच्या धावसंख्येत ४१ धावांचं योगदान दिलं. ज्याच्या बळावर मुंबईची धावसंख्या २० षटकांमध्ये १४९ वर पोहोचली. पण, याच सामन्यातील प्रथम सत्रात २०व्या षटकात पोलार्ड आणि पंचांमध्ये काहीसे मतभेद झाल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळालं. ड्वेन ब्राव्होने या षटकात गोलंदाजी केली. त्याने टाकलेले चेंडू हे 'वाईड' असूनही पंचांनी मात्र तसा कोणताच निर्णय दिला नाही. हे पाहून पोलार्डने त्याच्याच शैलीत या प्रसंगाला उत्तर दिलं. 


IPL 2019 VIDEO : मलिंगाला ओव्हर का दिली, इथपासून मलिंगाच खरा हिरो इथपर्यंत; शेवटच्या ओव्हरचा थरार



पंचांच्या निर्णयावर निराश पोलार्डने हवेत त्याची बॅट भिरकावत ती पुन्हा झेलली. पुढच्याच चेंडूवर तो स्टंप पुढे आला आणि खेलपट्टूपासून काहीसा दूर गेला. त्याची ही कृती पाहून मैदानावरील दोन्ही पंच त्याचं हे वर्तन चुकीचं असल्याचं सांगण्यास आले. पण, पोलार्डही त्याच्या भूमिकेवर ठामच होता. त्यामुळे या एका घटनेनेही सामन्याला वेगळंच वळण दिलं होतं. मुख्य म्हणजे मैदानात हे सारंकाही सुरू असताना सामना पाहण्यासाठी आलेल्या क्रीडारसिकांमध्येही यावेळी एकच कल्ला पाहायला मिळाला. परिणामी दुसऱ्याच दिवशी सोशल मीडियावरही हा प्रसंग ट्रेंडमध्ये आला. पंचाप्रती पोलार्डची ही वागणूक पाहता त्याला याची शिक्षा म्हणून सामन्याच्या मानधनातून देण्यात येणाऱ्या रकमेवर २५ टक्क्यांचा दंड लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.