हैदराबाद : रविवारचा सुट्टीचा दिवस असूनही अनेकांनीच सुट्टीचे कोणतेही बेत आखले नव्हते. निमित्त होतं ते म्हणजे आयपीएलच २०१९च्या IPL 2019 अंतिम सामन्याचं. मुंबई MI आणि चेन्नई CSK या दोन संघादरम्यान खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील शेवटचा आणि निर्णायक सामना हा खऱ्या अर्थाने उत्कंठा वाढवणारा आणि शेवटच्या चेंडूपर्यंत उत्सुकता शिगेला पोहोचवणारा ठरला. अखेरच्या चेंडूपर्यंतचा थरार नेमका काय असतो हे पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर पाहायला मिळालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनीच्या नेतृत्वाखाली मैदानातच आलेल्या दुसऱ्या सत्रात फलंदाजी करणाऱ्या चेन्नईच्या संघाला विजयासाठी एका चेंडूत दोन धावांची गरज होती. जवळपास अनेकांनीच हा सामना मुंबईच्या हातून गेल्याचं ठरवलंच होतं पण, शेवट गोड व्हायचाच होता. अंतिम सामन्यात अखेरच्या षठकासाठी (ओव्हरसाठी) कर्णधार रोहित शर्मा याने चेंडू लसिथ मलिंगाच्या हाती दिला. त्याचवेळी क्रीडारसिकांनी काहीसा नाराजीचा सूर आळवला. मलिंगाला यापूर्वीच्या षठकात फरसं यश मिळालं नसल्यामुळेच ही नाराजी होती. 


१५० धावांचा पाठलाग करणाऱ्या चेन्नईच्या संघाला शेवटच्या षटकात ९ धावांची आवश्यकता होती. मलिंगाच्या पहिल्या चेंडूवर वॉटसनने दिलेल्या फटक्यावर एक धाव काढण्यात आली. त्यानंतरच्या चेंडूवरही एक धाव काढण्यात चेन्नईच्या संघाला यश मिळालं. मलिंगाने टाकलेल्या चौथ्या यॉर्करला उत्तर देत चेन्नईच्या खेळाडूंनी पुढे दोन धावा केल्या. त्यानंतर अखेरच्या या षटकातील तिसऱ्या चेंडूवर पाच धावांची आवश्यकता असताना अफलातून क्षेत्ररक्षमाच्या बळावर स्थिरावलेल्या वॉटसनला धावबाद करण्यात मुंबईच्या संघाला यश मिळालं. ८० धावांचं योगदान देणारा वॉटसन तंबूत परतला. पाचव्या चेंडूतही चेन्नईच्या संघाने दोन धावा कमावल्या. शेवटच्या चेंडूवर चेन्नईच्या संघाला गरज होती अवघ्या दोन धावांची गरज असताना मलिंगाने मोठ्या आवेगात चेंडू टाकला आणि बस्स...! चेन्नईच्या संघावर मुंबईने एका धावेने मात केली. 


(या लिंकवर क्लिक करुन पाहा शेवटच्या ओव्हरचा संपूर्ण थरार)


शेवटच्या चेंडूपर्यंत खुद्द नीता अंबानी, सचिन तेंडुलकर आणि संघातील प्रत्येकाचाच इतकच नव्हे तर, क्रीडारसिकांचाही श्वास रोखून धरला होता. पण, मुंबईने हा सामना जिंकला आणि एकच जल्लोष पाहायला मिळाला. 'मलिंगा द हिरो', असं म्हणत सर्वांनीच मुंबईच्या संघाला विजय मिळवून देणाऱ्या या खेळाडूवर कौतुकाचा वर्षाव केला.