आयपीएल २०१९ : संपूर्ण वेळापत्रकाची घोषणा
आयपीएलच्या १२व्या मोसमासाठीच्या वेळापत्रकाची अखेर घोषणा करण्यात आली आहे.
मुंबई : आयपीएलच्या १२व्या मोसमासाठीच्या वेळापत्रकाची अखेर घोषणा करण्यात आली आहे. आयपीएलच्या सगळ्या टीम घरच्या मैदानात ७ सामने आणि बाहेर ७ सामने खेळणार आहे. दरवर्षी प्रमाणेच यावर्षीचंही वेळापत्रक आहे. लोकसभा निवडणुकीमुळे याआधी आयपीएलच्या सुरुवातीच्या २ आठवड्यांचं वेळापत्रकच घोषित करण्यात आलं होतं. यामुळे उरलेल्या सामने टीमना त्यांच्या घरच्या मैदानात खेळता येणार नाहीत, असा अंदाज होता. पण बीसीसीआयने मात्र आयपीएलच्या वेळापत्रकात कोणताही बदल केलेला नाही.
२३ मार्चला चेन्नई आणि बंगळुरूमध्ये पहिला सामना होईल, तर ग्रुप स्टेजमधला शेवटचा सामना ५ मे रोजी खेळवला जाईल. प्ले ऑफ आणि फायनलचं वेळापत्रक मात्र अजूनही घोषित करण्यात आलेलं नाही. लोकसभा निवडणुकीमुळे यंदाच्या वर्षी आयपीएलचे काही सामने भारताबाहेर खेळवण्यात येतील, असाही अंदाज वर्तवण्यात आला होता. २००९ सालच्या निवडणुकांमुळे संपूर्ण आयपीएल दक्षिण आफ्रिकेत खेळवली गेली. तर २०१४ च्या निवडणुकीवेळी आयपीएलचा अर्धा भाग युएईमध्ये आणि उरलेला भाग भारतात खेळवण्यात आला.
आयपीएलचं वेळापत्रक
२३ मार्च : चेन्नई विरुद्ध बंगळुरू, चेन्नई
२४ मार्च : कोलकाता विरुद्ध हैदराबाद, कोलकाता
मुंबई विरुद्ध दिल्ली, मुंबई
२५ मार्च : राजस्थान विरुद्ध पंजाब, जयपूर
२६ मार्च : दिल्ली विरुद्ध चेन्नई, दिल्ली
२७ मार्च : कोलकाता विरुद्ध पंजाब, कोलकाता
२८ मार्च : बंगळुरू विरुद्ध मुंबई, बंगळुरू
२९ मार्च : हैदराबाद विरुद्ध राजस्थान, हैदराबाद
३० मार्च : पंजाब विरुद्ध मुंबई, मोहाली
दिल्ली विरुद्ध कोलकाता, दिल्ली
३१ मार्च : हैदराबाद विरुद्ध बंगळुरू, हैदराबाद
चेन्नई विरुद्ध राजस्थान, चेन्नई
१ एप्रिल : पंजाब विरुद्ध दिल्ली, मोहाली
२ एप्रिल : राजस्थान विरुद्ध बंगळुरू, जयपूर
३ एप्रिल : मुंबई विरुद्ध चेन्नई, मुंबई
४ एप्रिल : दिल्ली विरुद्ध हैदराबाद, दिल्ली
५ एप्रिल : बंगळुरू विरुद्ध कोलकाता, बंगळुरू
६ एप्रिल : चेन्नई विरुद्ध पंजाब, चेन्नई
हैदराबाद विरुद्ध मुंबई, हैदराबाद
७ एप्रिल : बंगळुरू विरुद्ध दिल्ली, बंगळुरू
राजस्थान विरुद्ध कोलकाता, जयपूर
८ एप्रिल : पंजाब विरुद्ध हैदराबाद, मोहाली
९ एप्रिल : चेन्नई विरुद्ध कोलकाता, चेन्नई
१० एप्रिल : मुंबई विरुद्ध पंजाब, मुंबई
११ एप्रिल : राजस्थान विरुद्ध चेन्नई, जयपूर
१२ एप्रिल : कोलकाता विरुद्ध दिल्ली, कोलकाता
१३ एप्रिल : मुंबई विरुद्ध राजस्थान, मुंबई
पंजाब विरुद्ध बंगळुरू, मोहाली
१४ एप्रिल : कोलकाता विरुद्ध चेन्नई, कोलकाता
हैदराबाद विरुद्ध दिल्ली, हैदराबाद
१५ एप्रिल : मुंबई विरुद्ध बंगळुरू, मुंबई
१६ एप्रिल : पंजाब विरुद्ध राजस्थान, मोहाली
१७ एप्रिल : हैदराबाद विरुद्ध चेन्नई, हैदराबाद
१८ एप्रिल : दिल्ली विरुद्ध मुंबई, दिल्ली
१९ एप्रिल : कोलकाता विरुद्ध बंगळुरू, कोलकाता
२० एप्रिल : राजस्थान विरुद्ध मुंबई, जयपूर
दिल्ली विरुद्ध पंजाब, दिल्ली
२१ एप्रिल : हैदराबाद विरुद्ध कोलकाता, हैदराबाद
बंगळुरू विरुद्ध चेन्नई, बंगळुरू
२२ एप्रिल : राजस्थान विरुद्ध दिल्ली, जयपूर
२३ एप्रिल : चेन्नई विरुद्ध हैदराबाद, चेन्नई
२४ एप्रिल : बंगळुरू विरुद्ध पंजाब, बंगळुरू
२५ एप्रिल : कोलकाता विरुद्ध राजस्थान, कोलकाता
२६ एप्रिल : चेन्नई विरुद्ध मुंबई, चेन्नई
२७ एप्रिल : राजस्थान विरुद्ध हैदराबाद, जयपूर
२८ एप्रिल : दिल्ली विरुद्ध बंगळुरू, दिल्ली
कोलकाता विरुद्ध मुंबई, कोलकाता
२९ एप्रिल : हैदराबाद विरुद्ध पंजाब, हैदराबाद
३० एप्रिल : बंगळुरू विरुद्ध राजस्थान, बंगळुरू
१ मे : चेन्नई विरुद्ध दिल्ली, चेन्नई
२ मे : मुंबई विरुद्ध हैदराबाद, मुंबई
३ मे : पंजाब विरुद्ध कोलकाता, मोहाली
४ मे : दिल्ली विरुद्ध राजस्थान, दिल्ली
बंगळुरू विरुद्ध हैदराबाद, बंगळुरू
५ मे : पंजाब विरुद्ध चेन्नई, मोहाली
मुंबई विरुद्ध कोलकाता, मुंबई