जयपूर : चेन्नई विरुद्ध राजस्थान यांच्यात आज ११ एप्रिलला मॅच होणार आहे. ही मॅच राजस्थानच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर खेळली जाणार आहे. या मॅचला रात्री ८ वाजता सुरुवात होणार आहे. अंकतालिकेत चेन्नई १० अंकांसह पहिल्या तर राजस्थान २ अंकासह सातव्या क्रमांकावर आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


मुंबईविरुद्धचा पराभवाचा अपवाद वगळता चेन्नई सलगपणे मॅच जिंकत आहे. चेन्नईने मंगळवारी कोलकाता विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये ७ विकेटने विजय मिळवला. या विजयामुळे चेन्नईने अंकतालिकेत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. त्यामुळे या मॅचमध्ये विजयी होत आपली यशस्वी कामगिरी सुरु ठेवण्याचा मानस चेन्नईचा असेल.


चेन्नईने यंदाच्या आयपीएलमध्ये ६ मॅच खेळल्या असून त्यापैकी ५ मॅच जिंकल्या आहेत. एकमात्र मॅचमध्ये चेन्नईला पराभवाला सामोरे जावे लागले. तर  दुसऱ्या ठिकाणी राजस्थानला विजयाचा सुरु गवसताना दिसत नाहीये. राजस्थानने खेळलेल्या ५ मॅचपैकी ४ मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. एकमात्र विजय हा बंगळुरु विरुद्ध मिळवला आहे. राजस्थानला आयपीएलमधील आपले आव्हान कायम ठेवायचे असेल तर त्यांना आजच्या चेन्नईविरोधातील मॅचमध्ये विजय मिळवत पुनरागमन करावे लागेल. त्यातही ही मॅच होम ग्राऊंडवर होत असल्याने राजस्थाला आपल्या चाहत्यांचा सपोर्ट असणार आहे. त्यामुळे या मॅचमध्ये विजयी होत विजयपथावर परतण्याची संधी आहे.


चेन्नईचे तोडफोड खेळाडू


 चेन्नईने ५ मॅच जिंकल्याने त्यांचा विश्वास चांगलाच वाढलेला आहे. चेन्नईचा या आधी झालेल्या राजस्थान विरुद्धच्या मॅचमध्ये धोनीने नॉट आऊट ७५ रनची खेळी केली होती. चेन्नईकडे फॅफ ड्यू प्लेसिस, सुरेश रैना, शेन वॉटसन, केदार जाधव आणि धोनीसारख्या पट्टीच्या बॅट्समनचा समावेश आहे. तर बॉलिंगची जबाबदारी अनुभवी हरभजन सिंह आणि इमरान ताहिर या दोघांच्या खांद्यावर असणार आहे.


राजस्थानची निराशाजनक कामगिरी


राजस्थानला यंदाच्या  १२ व्या पर्वात चांगली कामगिरी करण्यास अपयश आले आहे. राजस्थानला प्ले ऑफमध्ये पोहचायचे असेल तर यापुढील सर्व मॅच राजस्थानला जिंकाव्या लागतील. राजस्थानला संजू सॅमसनची कमतरचा भासणार आहे. तो दुखापतीमुळे टीमबाहेर आहे. हैदराबाद विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये सॅमसनने शतकी कामगिरी केली होती. तसेच आपल्या खेळीसाठी ओळखल्या जाणाऱ्या जॉस बटलरला देखील विशेष काही करता आलेले नाही. तसेच राजस्थानचा कॅप्टन अंजिक्य रहाणे, बेन स्टोक्स आणि राहुल त्रिपाठी या तिकडीला अजूनही सूर गवसतताना दिसत नाही. त्यामुळे जर राजस्थानला विजय मिळवायचा असेल तर, राजस्थानच्या टीमला चांगली कामगिरी करावी लागेल.


चेन्नई टीम : महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), शेन वॉटसन, फॅफ डय़ू प्लेसिस, मुरली विजय, सुरेश रैना, अंबाती रायुडू, केदार जाधव, सॅम बिलिंग्स, रवींद्र जडेजा, ध्रूव शोरे, चैतन्य बिश्णोई, रितूराज गायकवाड, ड्वेन ब्राव्हो, करन शर्मा, इम्रान ताहिर, हरभजन सिंग, मिचेल सान्तनेर, शार्दूल ठाकूर, मोहित शर्मा, के. एम. आसिफ, ,स्कॉट कुगेलेईन, दीपक चहर आणि एन. जगदीशन.


राजस्थान टीम : अजिंक्य रहाणे (कॅप्टन), जोस बटलर, स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, अ‍ॅश्टन टर्नर, जोफ्रा आर्चर, ईश सोधी, ओशाने थॉमस, लियाम लिव्हिंगस्टोन, संजू सॅमसन, शुभम रांजणे, स्टुअर्ट बिन्नी, श्रेयस गोपाल, सुदेश मिधून, जयदेव उनाडकट, आर्यमन बिरला, प्रशांत चोप्रा, महिपाल लोरमोर, धवल कुलकर्णी, रियान पराग, कृष्णप्पा गौतम, वरुण एरॉन, शशांक सिंग, राहुल त्रिपाठी आणि मनन वोहरा.