IPL 2019: मैदानात न उतरताही रोहितचं रेकॉर्ड, पोहोचला दुसऱ्या क्रमांकावर
आयपीएलमध्ये पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे खेळू शकला नाही.
मुंबई : आयपीएलमध्ये पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे खेळू शकला नाही. रोहित शर्माऐवजी कायरन पोलार्डकडे मुंबईचं नेतृत्व देण्यात आलं. रोहितची दुखापत जास्त गंभीर नाही, पण आठवड्याभरात मुंबईला ३ मॅच खेळायच्या असल्यामुळे मुंबईला कोणताही धोका पत्करायचा नाही, त्यामुळे काळजीसाठी रोहितला आराम दिला असल्याची प्रतिक्रिया मुंबई टीमने दिली आहे.
पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये न खेळल्यानंतरही रोहितने रेकॉर्ड केला आहे. मुंबईकडून लागोपाठ १३३ मॅच खेळल्यानंतर रोहित ही मॅच खेळू शकला नाही. रोहित शर्मा २०११साली मुंबईच्या टीममध्ये शामिल झाला. यानंतर तो मुंबईकडून सगळ्या मॅच खेळला होता. २०११ आधी रोहित डेक्कन चार्जर्स हैदराबादकडून खेळायचा.
आयपीएलमध्ये एका टीमकडून सर्वाधिक मॅच खेळण्याचा रेकॉर्ड सुरेश रैनाच्या नावावर होता. रैनाने चेन्नईकडून २००८ ते २०१८ दरम्यान लागोपाठ १३४ मॅच खेळल्या. रोहितने पंजाबविरुद्धची ही मॅच खेळली असती तर त्याने रैनाच्या रेकॉर्डशी बरोबरी केली असती.
आयपीएलच्या एका टीमकडून सर्वाधिक मॅच खेळण्याच्याबाबतीत रैना पहिल्या क्रमांकावर, रोहित दुसऱ्या आणि विराट तिसऱ्या क्रमांकावर आहे. २००८ ते २०१६ दरम्यान विराटने बंगळुरूकडून लागोपाठ १२९ मॅच खेळल्या. धोनीनेही चेन्नईकडून खेळताना ११९ मॅच खेळल्या होत्या.
एका टीमकडून सर्वाधिक मॅच खेळणारे खेळाडू
सुरेश रैना- १३४ मॅच- चेन्नई- २००८ ते २०१८
रोहित शर्मा- १३३ मॅच- मुंबई- २०११ ते २०१९
विराट कोहली- १२९ मॅच- बंगळुरू- २००८ ते २०१६
एमएस धोनी- ११९ मॅच- चेन्नई- २०१० ते २०१९
गौतम गंभीर- १०८ मॅच- कोलकाता- २०११ ते २०१७