शारजाह : किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्यात पंजाबचा 8 विकेटने विजय झाला. कर्णधार विराट कोहलीने हा सामना गमवला. त्यानंतर तो म्हणाला की, 'मला वाटले की सामना 18 व्या ओव्हरमध्ये संपून जाईल. पण सामन्यात दबाव आला की काहीही शक्य असतं.' प्रथम फलंदाजी करणाऱ्या आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 6 गडी गमावून 171 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल पंजाबने 2 गडी गमावून 177 धावा केल्या आणि 20 व्या ओव्हरमध्ये हा सामना जिंकला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामना संपल्यानंतर कोहली म्हणाला की, हे फार आश्चर्यकारक होतं. आम्हाला वाटलं की सामना 18 व्या ओव्हरमध्ये संपेल. पण शेवटच्या ओव्हर्समध्ये थोडासा दबाव तुम्हाला गोंधळात टाकू शकतो. अशा परिस्थितीत काहीही शक्य आहे.' कोहलीने मात्र किंग्ज इलेव्हन पंजाबच्या चांगल्या कामगिरीचे कौतुक केले आणि सांगितले की, किंग्ज इलेव्हन पंजाबने चांगली कामगिरी बजावली. आम्ही यापेक्षा चांगल्या स्थितीत नव्हतो.'


एबी डिव्हिलियर्सला सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्याच्या निर्णयाचा बचाव करत तो म्हणाला की, 'आम्ही यावर बोललो, फलंदाजी दरम्यान आम्हाला उजव्या आणि डाव्या हाताच्या फलंदाजांची जोड हवी होती. 2 लेग स्पिनर गोलंदाजी करीत असल्याने थांबले. बर्‍याचदा गोष्टी आपल्यानुसार नसतात. आमची शिवम दुबे आणि वॉशिंग्टन सुंदरला फलंदाजीची संधी मिळावी अशी इच्छा होती.'