IPL 2020: DD vs SRH सामन्यात या २ खेळाडूंची कामगिरी ठरणार महत्त्वाची
दिल्ली विरुद्ध हैदराबाद सामन्यात या २ खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष
दुबई : दिल्ली कॅपिटल आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा सामना आज होणार आहे. आयपीएल 2020 च्या दुसर्या क्वालिफायर सामन्यापूर्वी भारतीय संघाचा माजी फलंदाज संजय बांगर यांनी म्हटलं की, केन विल्यमसन पुन्हा एकदा सनरायझर्स हैदराबादसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. तर दिल्लीसाठी शिखर धवनची कामगिरी महत्त्वाची असेल. विल्यमसनने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध महत्त्वपूर्ण खेळी खेळली. त्याने 44 बॉलमध्ये नाबाद 50 आणि जेसन होल्डरसह 65 धावांची भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला.
बांगर म्हणाले की, कर्णधार डेव्हिड वॉर्नरसह विल्यमसनचा खेळ हैदराबादसाठी खूप महत्वाचे आहे. शेवटच्या सामन्यात ते पाहायला मिळाले. दबाव हटवण्याचा आणि नंतर विरोधी संघावर दबाव आणण्याची क्षमता त्याच्यामध्ये दिसून आली. प्रत्येक खेळाडूमध्ये अशी क्षमता नसते. बांगर यांनी स्टार स्पोर्ट्स शोमध्ये हे वक्तव्य केलं आहे.
बांगर पुढे म्हणाले की, हैदराबादला विजयाची मोहीम सुरू ठेवण्यासाठी विल्यमसनचं खेळणं खूप महत्त्वाचं आहे. दिल्ली कॅपिटलविषयी बोलताना टीम इंडियाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक म्हणाले की, दिल्ली संघाला अंतिम फेरीत स्थान मिळवायचे असेल तर शिखर धवनला चांगला खेळ दाखवावा लागेल.
बांगर असेही म्हणाले की, धवन हा सामन्यातील मोठा खेळाडू आहे. विश्वचषक, आयसीसी चॅम्पियनशिप, जेव्हा जेव्हा आवश्यक होते तेव्हा संघात तो योगदान देतो. त्याला परिस्थितीची जाणीव आहे. त्याला सनरायझर्स हैदराबादबाबत चांगले माहित आहे. तो त्यांच्यासाठी खेळला आहे. रशीद खानचा सामना कसा करायचा हे त्याला माहित आहे. अशा परिस्थितीत हा डावखुरा फलंदाज जर चालला तर दिल्लीचा संघ जिंकू शकतो. आजचा सामना जिंकणार्या संघाचा सामना मंगळवारी फायनलमध्ये मुंबई इंडियन्सशी सामना होईल.