मुंबई : आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला २९ मार्चपासून सुरुवात होणार आहे. पण या स्पर्धेआधीच राजस्थानच्या टीमला मोठा धक्का लागला आहे. इंग्लंडचा आणि आयपीएलमध्ये राजस्थानकडून खेळणारा जोफ्रा आर्चर दुखापतग्रस्त झाला आहे. या दुखापतीमुळे तो इंग्लंडच्या श्रीलंका दौऱ्यातून बाहेर झाला आहे. तसंच आर्चर आयपीएलमध्येही खेळू शकणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जोफ्रा आर्चरच्या कोपराला फ्रॅक्चर झाल्यामुळे तो श्रीलंका दौऱ्यात आणि आयपीएलमध्ये खेळणार नाही, अशी माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली आहे. आर्चरने कोपराला झालेल्या दुखापतीचं स्कॅनिंग केलं. या स्कॅनिंगमध्ये आर्चरला फ्रॅक्चर असल्याचं स्पष्ट झालं, असं प्रसिद्धी पत्रक इंग्लंड क्रिकेट बोर्डाने काढलं आहे.


२४ वर्षांचा जोफ्रा आर्चरचं क्रिकेट बोर्डाच्या मेडिकल टीमसोबत रिहॅबिलिटेशन करण्यात येणार आहे. जोफ्रा आर्चरला जूनच्या शेवटच्या आठवड्यात सुरु होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यातल्या ३ टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी फिट करण्याचं लक्ष्य आहे.



इंग्लंडच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात जोफ्रा आर्चर शेवटच्या ३ टेस्ट मॅचमध्ये खेळू शकला नव्हता. फिटनेस सुधारण्यासाठी आर्चर दक्षिण आफ्रिकेवरून इंग्लंडला परतला होता.


२०१९ साली इंग्लंडने जिंकलेल्या वर्ल्ड कपमध्ये आर्चरने मोलाची भूमिका निभावली होती. आर्चरच्या अनुपस्थितीमध्ये राजस्थानच्या टीमला नवा फास्ट बॉलर शोधावा लागणार आहे.