दुबई : आयपीएल 2020 च्या 14 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्ज संघाचा 7 धावांनी पराभव केला. या स्पर्धेत हैदराबादचा हा सलग दुसरा विजय आहे. सनरायझर्स हैदराबादकडून देण्यात आलेल्या 165 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई ओव्हरमध्ये फक्त 157-5 धावा करू शकला. हैदराबादकडून प्रियाम गर्गने नाबाद 51 धावांची खेळी केली. दुसरीकडे सीएसकेकडून रवींद्र जडेजाने 50 धावा आणि कर्णधार धोनीने नाबाद 47 धावा केल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएल 2020 च्या या रोमांचक सामन्यात सनरायझर्स हैदराबादने सीएसके संघाचा 7 धावांनी पराभव करत या स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदविला.


दुखापतीमुळे भुवनेश्वर कुमार मैदानाबाहेर गेला. त्यामुळे हैदराबादच्या चिंता वाढल्या आहेत. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार 19 व्या ओव्हरमध्ये दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला.


अर्धशतक झळकल्यानंतर जडेजा बाद झाला


रवींद्र जडेजाने शानदार खेळला. त्याने 35 चेंडूत 50 धावांची खेळी केली. यानंतर तो नटराजनच्या चेंडूवर आऊट झाला. दुसरीकडे खराब फॉर्ममध्ये असलेला केदार जाधव देखील काही खास कामगिरी करु शकला नाही. शानदार लयमध्ये असलेल्या फाफ डुप्लेसिसने आज मात्र फक्त 22 धावा केल्या.


वॉटसनच्या बाद झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा फॉर्मात असलेला फलंदाज अंबाती रायुडूच्या रुपात दुसरा धक्का बसला. रायुडूला 8 धावांवर वेगवान गोलंदाज टी नटराजनने बोल्ड केले.