मुंबई : आयपीएलच्या IPL 2020 यंदाच्या हंगामातील आणखी एक सामना शारजाह येथील स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यादरम्यान मुंबई आणि हैदराबाद असे दोन संघ एकमेकांसमोर उभे ठाकले. या सामन्यात मुंबईच्या संघानं हैदराबादवर ३४ धावांनी मात केली. या सामन्यासाठी मुंबईच्या संघात कोणताही बदल करण्यात आला नव्हता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इथं हैदराबादच्या संघात दुखापतग्रस्त भुवनेश्वर कुमार याच्याऐवजी संदीप शर्मा आणि खलील अहमद याच्या जागी सिद्धार्थ कौल यांना स्थान देण्यात आलं. सामन्यात नाणेफेक जिंकत मुंबईच्या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 


प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या मुंबईच्या संघानं २० षटकांमध्ये ५ गडी बाद २०८ धावा करत विरोधी संघापुढं २०९ धावांचं लक्ष ठेवलं. मुंबईकडून क्विंटन डे कॉकनं सर्वाधिक म्हणजेच ६७ धावा केल्या. मुंबईचं हे आव्हान पेलत हैदराबादचा संघ मैदानात आला. 



 


हैदराबादच्या खेळाडूंनी २० षटकांमध्ये ७ गडी गमावत अवघ्या १७४ धावाच केल्या. परिणामी हा सामना मुंबईनं जिंकला. या सामन्यातील विजयासह मुंबईच्या संघानं आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील तिसऱ्या विजयाची नोंद केली. तर, हैदराबादच्या संघाताल तिसऱ्यांदा पराभवाला सामोरं जावं लागलं.