अबुधाबी : आयपीएल 2020 च्या 21 व्या सामन्यात कोलकाताने चेन्नई सुपर किंग्सचा 10 रनने पराभव केला आहे. टॉस जिंकल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने आधी बॅटींग करण्याचा निर्णय घेतला होता. कोलकाता नाईट रायडर्सने 20 ओव्हरमध्ये 154 रन केले. केकेआरसाठी राहुल त्रिपाठीने सर्वाधिक 51 बॉलमध्ये 81 रनची खेळी केली. चेन्नई सुपर किंग्जने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमवत फक्त 157 रनपर्यंत मजल मारता आली. ज्यामुळे 10 रनने चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील 4 सामन्यामध्ये फलॉप ठरलेल्या ओपनर सुनील नरेनला आज केकेआरने ओपनिंगला पाठवलं नाही. त्याच्या जागी आज राहुल त्रिपाठी आला होता. त्याने आज शानदार कामगिरी केली. शुभमन गिलने 11 रन केले. नितीश राणा आज 9 रनवर आऊट झाला. नरेनने 9 बॉलमध्ये आज 17 रन केले. 


चेन्नईचा धडाकेबाज खेळाडू डुप्लेसिस आज 17 रनवर आऊट झाला. अंबाती रायुडूने आज 30 रन केले. शेन वॉटसन 50 रन केले. पण सुनील नरेनच्या बॉलवर तो LBW आउट झाला.


कर्णधार धोनी 11 रनवर आऊट झाल्यानंतर चेन्नईचा विजयाचा मार्ग कठीण झाला. सॅम कुर्रनने 17 रन तर रवींद्र जड़ेजा 21 रन केले. आज केदार जाधव 7 रनवर नाबाद राहिला.