दुबई : इंडियन प्रीमियर लीगचा 13 वा सीजन खूप रोमांचकारी ठरला आहे. या मोसमात शेवटचा साखळी सामना आज संध्याकाळी मुंबई इंडियन्स व सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जाईल. या सामन्यानंतर प्ले ऑफमध्ये खेळणारा कोणता चौथा संघ असेल हे निश्चित होईल. हैदराबादने आज मुंबईच्या संघाला हरवले तर ते थेट प्लेऑफमध्ये प्रवेश करतील आणि कोलकाता स्पर्धेबाहेर जाईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजच्या लीग सामन्यानंतर प्लेऑफचे 4 संघ ठरणार आहेत. हैदराबादने आज मुंबईला पराभूत केले तरच ते प्लेऑफमध्ये जाणार आहेत. पण पराभव झाला तर केकेआरचा प्लेऑफमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा होईल.


हैदराबादसाठी शेवटची संधी


मुंबईविरुद्धच्या या सामन्यात हैदराबाद संघाने विजय मिळवला तर त्यांचे 14 गुण होतील. 13 सामन्यांपैकी त्यांनी 6 सामने जिंकले आहेत. एका विजयाची त्यांना आणखी आवश्यकता आहे. कोलकाताचे 14 गुण आहेत. पण नेट रनरेटचा त्यांना फटका बसू शकतो.


दिल्ली कॅपिटलने बंगळुरुला पराभूत करुन प्लेऑफमध्ये प्रवेश केला. पण बंगळुरू देखील प्लेऑफमध्ये पोहोचला. आता चौथा संघ कोलकाता असणार की हैदराबाद हे आज ठरणार आहे. हैदराबादसाठी ही शेवटची संधी आहे आणि थेट मुंबईला पराभूत करण्याचं तगडं आव्हान त्यांच्यासमोर आहे.