अबुधाबी : आयपीएल 2020 चा 20 वा सामना आज मुंबई आणि राजस्थान संघात रंगणार आहे. या आयपीएल मोसमातील मुंबई इंडियन्स हा दुसरा यशस्वी संघ आहे. तर राजस्थान रॉयल्स संघाने सलग दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलच्या इतिहासात, मुंबई आणि राजस्थान यांच्यात खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांमध्ये आतापर्यंत कोणाची बाजू मजबूत राहिली आहे. हे आपण पाहणार आहोत.


हे लक्षात घेण्यासारखे आहे की जेव्हा जेव्हा राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्सचे संघ इंडियन प्रीमियर लीगमध्ये एकमेकांसमोर आले तेव्हा कांटे की टक्कर पाहायला मिळाली. गेल्या पाच सामन्यांमध्ये जर या दोन संघांच्या विक्रमाचा विचार केला तर राजस्थान रॉयल्सची कामगिरी चांगली राहिली आहे.


गेल्या 5 आयपीएल सामन्यांपैकी फक्त एक सामना मुंबई इंडियन्सने जिंकला आहे. 5 सामन्यात राजस्थानने आघाडी मिळविली आहे. मुंबई इंडियन्सचा संघ राजस्थान विरुद्ध 2015 मध्ये नंतर एकही सामना जिंकण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे आज रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईचा संघ 5 वर्षांनंतर राजस्थान रॉयल्सला हरवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.


या आयपीएल 2020 मध्ये मुंबई इंडियन्सने 5 सामने खेळले असून 3 सामने जिंकले आहेत तर 2 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबईनेही त्यांच्या शेवटच्या सामन्यात शानदार विजय मिळविला आहे.


दुसरीकडे राजस्थान रॉयल्स (आरआर) संघाने स्पर्धेची सुरुवात अत्यंत आक्रमकपणे केली होती. त्यांनी सलग 2 सामने जिंकले होते, परंतु शेवटच्या दोन सामन्यांतील पराभवानंतर रॉयल्सचे गणित बिघडले आहे. अशा परिस्थितीत राजस्थान रॉयल्सला मुंबई इंडियन्सविरूद्ध विजय मिळवायचा आहे.