दुबई : आयपीएल २०२० ची सुरुवात झालेली आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ फलंदाजीदरम्यान असे अनेक शॉट्स मारतो ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटेल. त्याचे फलंदाजीचे तंत्र रोमांचकारी आहे. स्मिथ फलंदाजी दरम्यान कलात्मक शॉट्स खेळण्यासाठी ओळखला जातो. आता स्मिथ हेलिकॉप्टर शॉटवर प्रभुत्व मिळवताना दिसत आहे. राजस्थान रॉयल्सने सराव सत्राचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात स्मिथ हेलिकॉप्टर शॉट मारताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनीच्या 'हेलिकॉप्टर शॉट'चे अनुकरण करून स्मिथने हे देखील सिद्ध केले की आगामी आयपीएल सामन्यांमध्ये तो हेलिकॉप्टर शॉट्स मारतानाही दिसू शकतो. स्मिथशिवाय आता हार्दिक पांड्या आणि राशिद खानसारखे खेळाडूही धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटप्रमाणे फलंदाजी करताना आणि फटके मारताना दिसतात.



सीएसके विरुद्ध खेळलेल्या सामन्यात स्मिथने शानदार अर्धशतक झळकावले. आता राजस्थानचा पुढील सामना किंग्ज इलेव्हन पंजाबशी होणार आहे.


सीएसके विरुद्ध स्मिथने 47 चेंडूत 69 धावा केल्या. राजस्थानने सीएसकेविरुद्धच्या सामन्यात 16 धावांनी शानदार विजय मिळविला. संजू सॅमसनसह स्मिथने दुसऱ्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी केली, ज्यामुळे राजस्थान 216 धावा केल्या होत्या. सीएसकेचा संघ लक्ष्याचा पाठलाग करताना 20 ओव्हरमध्ये 206 धावा करु शकला.


पंजाबविरुद्धच्या सामन्यात राजस्थानचा खेळाडू जोस बटलर देखील संघात परतेल. क्वारंटाईन असल्याने तो पहिल्या सामन्यात खेळू शकला नव्हता.