मुंबई : आयपीएलच्या २०२० सालच्या कार्यक्रमात बदल झाला आहे. सुरुवातीला यंदाचा सीझन २३ मार्चपासून सुरु होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २९ मार्चपासून आयपीएलला सुरुवात होईल. दिल्ली टीमच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार २९ मार्च ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलच्या १३व्या मोसमाचा पहिला सामना २९ मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होईल. गतविजेती मुंबई आपला किताब वाचवण्यासाठी मैदानात उतरेल आणि नव्या मोसमाची सुरुवात करेल. आयपीएलच्या वेबसाईटवर अजून अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं नाही.


२९ मार्चपासून आयपीएलला सुरुवात होत असल्यामुळे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंना सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकावं लागणार आहे. या कालावधीमध्ये ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये टी-२० सीरिज आणि इंग्लंड-श्रीलंकेमध्ये टेस्ट सीरिज सुरु असेल. या दोन्ही सीरिज ३१ मार्चला संपणार आहेत.