दुबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) दरम्यान सराव करण्यासाठी युएईचा कर्णधार अहमद रझा आणि युवा खेळाडू कार्तिक मयप्पनचा संघात समावेश केला आहे. आरसीबीचा आयपीएल 2020 मधला पहिला सामना 21 सप्टेंबरला दुबईमध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, अहमद रझाने क्वारंटाईन काळ पूर्ण केला आहे आणि विराट कोहलीच्या टीमबरोबर तो सराव करत आहे. डावखुरा फिरकीपटू रझाला बॉलिंग कोच श्रीधरन श्रीराम यांच्या सांगण्यानुसार बोलावण्यात आले आहे.


अहमद रझा म्हणाला की, 'माझी खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्‍यांशी ओळख करुन देण्यात आली. श्री यांच्याकडून माझ्याबद्दल ऐकून आनंद झाला. आपण कल्पना करू शकता की, एबी सारखा एखादा खेळाडू माझाकडे आला आणि म्हणाला की आमच्या मदतीसाठी धन्यवाद. यावर विश्वासच बसत नाही.'


31 वर्षीय रझा 14 वर्षांपासून युएई संघाचा सदस्य आहे. त्याने 31 एकदिवसीय सामन्यात 35 विकेट घेतले आहेत. दुसरीकडे, कार्तिक हा लेगस्पिनर आहे जो युएईकडून चार एकदिवसीय सामने खेळला आहे.