मुंबई :  भारतीय क्रिकेट संघाच आपल्या गोलंदाजीच्या बळावर क्रीडा रसिकांची मनं जिंकणाऱ्या जहीर खान याच्यावर सध्या आयपीएलमध्येही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आयपीएलच्या या हंगामात IPL 2020 मध्ये जहीर मुंबईच्या संघासाठी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावत आहे. मुख्य म्हणजे तो मुंबईच्या खेळाडूला चक्क मराठीतूनच प्रशिक्षण देत आहे. जहीर मास्तरांची ही शाळा नेमकी आहे तरी कशी याचीच झलक एका व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईच्या संघातर्फे अधिकृत फेसबुक पेजवरुन याबाबतचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. मुंबईच्या संघातील गोलंदाज दिग्विजय देशमुख याला गोलंदाजी करतेवेळी काही मदत हवी झाली, अडचणीच्या या वेळी जहीरनं त्याला मोलाचा सल्ला दिल्याचं पाहायला मिळालं. तेसुद्धा अगदी मराठमोळ्या अंदाजात. 


गोलंदाजी करतेवेळी दिग्विजयला फूटवर्क कसं असावं याबाबत सल्ला देत असताना दिग्विजय ज्या गोष्टीमुळं काहीसा चिंतीत दिसत होता त्या गोष्टीचा फारसा विचारकरु नकोस असा अतिशय आपुलकीचा सल्ला जहीरनं त्याला दिला. 



परदेशातही जहीरचा हा अंदाज सध्या अनेकांचीच मनं जिंकत आहे. मुख्य म्हणजे त्यांचा हा मराठमोळा अंदाज अनेकांनाच हवाहवासा वाटत आहे असं म्हणायला हरकत नाही. जहीरनं दिग्विजयला दिलेला हा सल्ला फक्त त्याच्यासाठीच नव्हे, तर इतरही गोलंदाजांसाठी अत्यंच मोलाचा ठरेल असाच आहे.