कोलकाता पाठोपाठ हैदराबाद आणि दिल्ली संघात शिरला कोरोना, 2 खेळाडू कोरोनाच्या विळख्यात
IPL 2021 3 टीममध्ये कोरोनाचं थैमान, 4 खेळाडूंना कोरोनाची लागण
मुंबई: कोलकाता आणि चेन्नई पाठोपाठ आता दिल्ली आणि सनरायझर्स हैदराबाद संघात कोरोनाचा शिरकाव झाल्यानं खळबळ उडाली आहे. सनरायझर्स हैदराबाद संघातील एका खेळाडूचा तर दिल्ली कॅपिटल्स संघातील बॉलरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
नुकतेच कोलकाता संघातील दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आले होते. वरून चक्रवर्ती आणि वॉरियरचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर चेन्नई संघातील बॉलिंग कोचचाही रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आज दिल्ली संघातील बॉलर अमित मिश्रा तर हैदराबाद संघातील वर्धमान साहचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
आयपीएलमधील 4 खेळाडू तर एक बॉलिंग कोचला कोरोनाची लागण झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान कोलकाता विरुद्ध बंगळुरू सामना तात्पुरता स्थगित करण्यात आला होता.
हैदराबाद संघाचे खेळाडू आयसोलेशनमध्ये आहेत. दिल्ली कॅपिटल्स संघाला BCCIने क्वारंटाइन राहण्याचे निर्देश दिले आहेत. आज हैदराबाद विरुद्ध मुंबई सामना संध्याकाळी 7.30 वाजता होणार होता. मात्र आता तो होणार नाही. हा सामना पुढे ढकलला जाऊ शकतो.
वरूण चक्रवर्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यापाठोपाठ चेन्नई संघातील बॉलिंग कोचचा रिपोर्टही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. कोच लक्ष्मीपति बालाजी आणि बस क्लिनरचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावनं चेन्नई संघाचं देखील टेन्शन वाढलं आहे.