मुंबई : आय़पीएल म्हणजे क्रिकेट, आयपीएल म्हणजे धमाल आणि आयपीएल म्हणजे ग्लॅमर. एका वेगळ्याच विश्वात असणाऱ्या या झगमगाटाचा अनेकांनाच हेवा वाटतो. नवे चेहरे, नव्या संधी यांची कायमच आयपीएलमध्ये रेलचेल असल्याचं पाहायला मिळतं. अशा या अनोख्या दुनियेमध्ये यंदाच्या वर्षी एक चेहरा सर्वांचं लक्ष वेधत आहे. हा चेहरा आहे, अँकर तान्या पुरोहित हिचा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तान्या मुळची उत्तराखंडमधील श्रीनगर येथील रहिवासी. पण, कामानिमित्त ती सध्या मुंबईत असते. तिनं गढवाल विद्यापीठातून मास कम्युनिकेशनमध्ये पदय्वुत्तर शिक्षण घेतलं आहे. तान्या, अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्यासोबत ‘एन एच 10’ या चित्रपटामध्येही झळकली होती. तिनं वृत्तनिवेदक दीपक डोभालशी लग्नगाठ बांधली.


आयपीएल 2021 च्या निमित्तानं तान्याचा चेहरा नव्यानं सर्वांसमोर आला. इथं  क्रिकेट लाईव्ह शो होस्ट करत असून, यामध्ये क्रिकेटपटू इरफान पठान तिला साथ देताना दिसतो. हिंदी भाषेवर असणारं प्रभुत्त्वं तान्याचं वेगळेपण सिद्ध करुन जातं. इतकंच नव्हे, तर तिला या साऱ्यामध्ये चांगली प्रसिद्धीही मिळते.



आयपीएलच्या निमित्तानं शिबानी दांडेकर, संजना गणेशन आणि अशी अनेक नावं समोर आली, त्यांना अमाप प्रसिद्धीही मिळाली. अशाच नावांच्या यादीमध्ये आता तान्या पुरोहितच्याही नावाचा समावेश होत आहे असं म्हणायला हरकत नाही.