मुंबई: IPLच्या 14 व्या हंगामाला अवघ्या तीन दिवसांत सुरुवात होत आहे. कोरोनाचं सावट यंदाच्या IPLवर असलं तरी ह्या स्पर्धा गाइडलाइन्स पाळून होणार आहेत. यंदाच्या IPLमध्ये मात्र दिल्ली कॅपिटल्स संघ श्रेयस अय्यरला खूप जास्त मिस करणार आहे. IPLआधी म्हणजे 8 एप्रिलला श्रेयसच्या खांद्यावर शस्रक्रिया करण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या वन डे सामन्यादरम्यान श्रेयसच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे तो वन डे सीरिजमधून बाहेर पडला तर IPLमध्ये देखील खेळू शकणार नाही. 8 एप्रिलला त्याच्या हाताचं ऑपरेशन होणार आहे. 


दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार असलेला श्रेयस अय्यर दुखापतीमुळे बाहेर असल्यानं संघाचं नेतृत्व ऋषभ पंतकडे सोपवण्यात आलं आहे. यंदाच्या IPLमध्ये जरी श्रेयस खेळणार नसला तरी BCCIच्या एका निर्णयाचा फायदा त्याला होणार आहे.


श्रेयसला IPLन खेळताही 7 कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे. भारतीय संघाकडून खेळताना श्रेयसला दुखापत झाल्यानं BCCIच्या निर्णयाचा फायदा श्रेयसला होणार आहे. दिल्ली कॅपिटल्ससोबत श्रेयसनं 7 कोटी रुपयांचं कॉन्ट्रॅक्ट केलं होतं. IPLच्या नियमानुसार तो जरी IPL खेळला नाही तरी त्याला पूर्ण पैसे देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. श्रेयसच्या खांद्यावर 8 एप्रिलला शस्रक्रिया करण्यात येणार आहे. 


बीसीसीआयच्या विमा पॉलिसी अंतर्गत श्रेयस अय्यर यांना पूर्ण वेतन मिळणार आहे. २०११ मध्ये बीसीसीआयने हा नियम लागू केला की, जर बोर्डाच्या करारानुसार कोणताही खेळाडू दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला असेल तर आयपीएल त्या खेळाडूला पूर्ण पगार किंवा वेतन देईल. या करारानुसार दिल्ली कॅपिटल्सकडून पूर्ण वेतन श्रेयसला मिळणार आहे.