मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने दुसरा सामना जिंकत पॉइंट टेबलमध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे. 6 धावांनी हैदराबादवर विजय मिळवला आहे. यावेळी चर्चा आहे ती मॅक्सवेलची सलग दोन सामन्यांमध्ये त्याची जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्लॅन मॅक्सवेलनं विराट कोहलीनं दिलेल्या ऑफरबाबत खुलासा केला आहे. त्याने कोहलीनं दिलेली ऑफर सांगताच सर्वांना खूप आश्चर्य वाटलं. ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर असलेला खेळाडू मॅक्सवेल आणि विराट कोहली यांची ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान चर्चा झाली होती. 



ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना ग्लॅन मॅक्सवेलला RCB फ्रेन्चायजीमध्ये समाविष्ट होण्याची ऑफर विराट कोहलीनं दिली होती असा खुलासा मॅक्सवेलनं केला आहे. त्यानंतर मी त्या ऑफरवर विचार केला. पंजाबने रिलीज केल्यानंतर IPL लिलावात मॅक्सवेलला RCB संघाने 14.25 कोटी रुपये देऊन संघात समाविष्ट करून घेतलं. 


 


मॅक्सवेलनं हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात 41 चेंडूमध्ये 59 धावांची खेळी केली आहे. याआधी देखील मॅक्सवेलनं मुंबई विरुद्धच्या सामन्यात चांगली खेळी केली होती. त्याचा हा फॉर्म पाहून सोशल मीडियावर चाहत्यांनी प्रिती झिंटाला ट्रोल केलं आहे.